घरगुती उपचाराने घालवा चष्मा !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2017 11:45 AM
सध्याच्या युगात लहान मुलांना खूप लवकर चष्मा लागतो कारण त्याच्यावर अभ्यासाचे दडपण एवढे असते की त्याचे डोळे कमजोर होतात आणि डॉक्टर्स त्यांना चष्मा लावण्याचा सल्ला देतात.
-Ravindra Moreसध्याच्या युगात लहान मुलांना खूप लवकर चष्मा लागतो कारण त्याच्यावर अभ्यासाचे दडपण एवढे असते की त्याचे डोळे कमजोर होतात आणि डॉक्टर्स त्यांना चष्मा लावण्याचा सल्ला देतात. मात्र आजच्या युगातही आयुर्वेदिक उपायांनी चष्मा घालविला जाऊ शकतो. हो, असे अनेक उपाय आहेत जे चष्मा कधी लागू देत नाहीत. बरेचजण चष्म्यापासून त्रास होतो. कारण त्यांच्या मते त्यांच्या सौंदर्यात चष्मा आडवा येतो आणि चष्मा घालविण्यासाठी अनेक पर्याय अवलंबितात. मात्र योग्य उपचार न केल्यामुळे कोणताही आजार बरा होत नाही. आम्ही आपणास असा उपचार सांगत आहोत ज्याने आपल्या डोळ्यांवरचा चष्मा कायमचा दूर होईल.* नेत्र ‘ज्योतिवर्धक उपचार’- या उपचारासाठी काही पदार्थांची आवश्यकता असते. ज्यात बदाम गिरी, मिशरी आणि बडीशेपला एकत्र करुन मिक्सरच्या साह्याने किंवा कुटून बारिक चूर्ण तयार करा आणि काचेच्या भांड्यात घ्या. या मिश्रणाला दररोज १० ग्रॅमच्या मात्रेत २५० मिली दुधासोबत ४० दिवसापर्यंत घ्या. याने आपला चष्मा तर दूर होईल शिवाय आपली दृष्टी अगोदरपेक्षा जास्त तेजस्वी होईल. - थंड पाणी तोंडात घेऊन डोळ्यांवर पाणी शिंपडल्यानेही डोळे तेजस्वी होतात. असे दिवसभरातून तीन वेळेस केल्याने लवकर फायदा मिळतो. - जवसाच्या तेलाने पाय आणि पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने आणि जवसाचे तेल पाण्यात टाकून अंघोळ केल्यानेही डोळ्यांचे तेज वाढते. - लाल भाजीपाला किंवा लाल फळांचे सेवन करा, जसे गाजर, टमाटर आदी दिवसातून दोनदा यांचा ज्यूस प्या. यामुळे डोळ्यांचे तेज वाढण्यास मदत होते