दूधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही दुस-या पदार्थांसोबत दूध पिण्याचे काही दुष्परिणामही आहेत. आयुर्वेदानुसार त्या पदार्थांसोबत दूध प्यायल्यास पचनासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेशी निगडीत समस्या होतात. जे लोक बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात असतात, त्यांना ब-याचदा केळी आणि दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्या दूधासोबत खाऊ नये.
1) केळीसोबत
तुम्ही जिमला जाणा-यांना तुम्ही अनेकदा केळीसोबत दूधाचे सेवन करताना पाहिले असेल. पण दूधासोबत केळी किंवा ताक पिणे घातक ठरु शकतं. यामुळे पचनप्रक्रिया बिघडू शकते आणि शरीरात टॉक्सिन वाढण्याची शक्यता असते. यासोबतच तुम्हाला सर्दी-खोकला आणि अॅलर्जीची समस्याही होऊ शकते.
2) मासे आणि दूध
चुकूनही मास्यांसोबत दूध घेऊ नये किंवा मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. असे सांगितले जाते की, मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास चेह-यावर पांढरे डाग येतात. तसेच अॅसिडीटी आणि ओकारीची समस्याही होते.
3) आंबट फळासोबत
आयुर्वेदानुसार, दूध आणि फळांचं एकत्र सेवन करु नये. कारण दूध एक लॅक्सेटिव्ह आहे. त्यासोबतच फळे पचायला हलके असतात आणि दूध पचायला वेळ लागतो. यामुळे तुम्हाला पोट दुखी आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
4) या गोष्टींची घ्या काळजी
आयुर्वेदानुसार, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं एकत्र सेवन करु नये. दूधासोबत केळी खाल्ल्यास कफ होण्याची शक्यता आहे. यासोबतच यांच्या एकत्र सेवनाने पचनक्रियेवर परिणाम होतो. अनेकांना तुम्ही दूधासोबत ब्रेड-बटर खातांना पाहिले असेल, पण यामुळे जडपणा वाटू शकतो.