शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

फडफडणाऱ्या डोळ्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 2:11 PM

बरेचदा आपण काही गोष्टींचा अंधश्रद्धाळू प्रमाणे विचार करतो. त्यातीलच एक म्हणजे फडफडणारा डोळा. डोळा फडफडायला लागला म्हणजे काहीतरी अघटीत होणार असा समज ठरलेलाच पण आज जाणून घेऊया डोळा फडफडण्यामागची नेमकी कारणं काय?

बरेचदा आपण काही गोष्टींचा अंधश्रद्धाळू प्रमाणे विचार करतो. त्यातीलच एक म्हणजे फडफडणारा डोळा. डोळा फडफडायला लागला म्हणजे काहीतरी अघटीत होणार असा समज ठरलेलाच पण आज जाणून घेऊया डोळा फडफडण्यामागची नेमकी कारणं काय?

पापण्यांच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे डोळा मिटतो. दरम्यान हे खालच्या आणि वरच्या दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. वैद्यकीय भाषेत या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यांना मायोकेमिया, ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म असे म्हणतात.

मायोकेमियामायोकेमिया स्नायूंच्या सामान्य संकुचिततेमुळे होतो. डोळ्याच्या खालच्या पापण्यांवर याचा जास्त परिणाम होतो. हे अगदी थोड्या वेळासाठी असते आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे यावर मात करता येते.

ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्मब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म दोन्ही गंभीर आहेत. जे अनुवांशिक कारणांमुळे होतात. या अवस्थेत, रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो.

डोळे फडफडण्याचं खरं कारणडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात बॅन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस आणि पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. तर जीवनशैलीतील काही त्रुटींमुळे लोकांनाही अशा समस्या येऊ शकतात.

डोळे फडफडण्याची इतर कारणं

आय स्ट्रेन- जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी ड़ोळ्यांना आराम देणं गरजेचं आहे. 

अपुरी झोप- डोळा फडफडण्यामागे अपुरी झोप हे देखील एक कारण असू शकतं. डॉक्टर म्हणण्याप्रमाणे, व्यक्तीने कमीत कमी 7-9 तासांची झोप घेतली पाहिजे.  त्यापेक्षा कमी झोप घेतलात तर डोळ्यांवर ताण येतो. 

ताण- तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स