शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पित्ताशयाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, पडेल महागात...बघा डॉक्टर काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 4:50 PM

आपल्या शरीरातील कोणत्याही भागात बिघाड झाला कि आपल्याला लगेचच त्या आजारांची लक्षणे दिसू लागतात. त्यावर उपाय करणे जरुरीचे असते. पित्ताशयाची समस्या अशीच एक. जाणून घेऊया लक्षणे आणि उपाय...

आपल्या शरीरातील कोणत्याही भागात बिघाड झाला कि आपल्याला लगेचच त्या आजारांची लक्षणे दिसू लागतात. त्यावर उपाय करणे जरुरीचे असते. पित्ताशयाची समस्या अशीच एक. यामध्ये वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे शरीरात पित्ताचे खडे होतात. जर्नल और लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ.अमित अग्रवाल यांनी नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळाला या आजाराची लक्षणे आणि कारणे सांगितली आहेत.

पित्ताशयाचे कार्य काय?पित्ताशय हा यकृताच्या मागे व खालच्या बाजूला असलेला एक छोटा पिशवीसारखा अवयव आहे. पित्ताशयाचे मुख्य काम पित्त साठवणे व त्याचा निचरा करणे होय. यामुळे आहारातील चरबीचे पचन होण्यास मदत होते.

पित्ताशयात खडे होण्याची कारणे काय असतात?पित्तामध्ये कोलेस्टेरॉल तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या सर्वांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास पित्ताशयात खडे तयार होतात असे मानले जाते. बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि या अतिरिक्त कोलेस्टेरॉलचे खडे तयार होतात. पित्ताशयातील खडे हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारा त्रास आहे.

पित्ताशयात खडे होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढतो प्रमाणापेक्षा जास्त वजनस्त्स्त्रियांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचा त्रास पुरुषांपेक्षा २ ते ३ पटींनी जास्त आढळतो.४० वर्षांपेक्षा जास्त वयस्त्रियांमध्ये मुले झाल्यानंतर - गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते व म्हणूनच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.

पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय असतात?पोटात तीव्र वेदना. या वेदना पोटातून उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जातात. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर विशेषतः चरबीयुक्त (तेल-तूप असणारे) पदार्थ खाल्ल्यानंतर या वेदना वाढतात. पोटात टोचल्यासारखे किंवा कळ येऊन दुखते किंवा मध्यम तीव्रतेचे पण सतत दुखते. दीर्घ श्वास घेतल्यावर वेदना वाढतात. छातीत दुखते. छातीत जळजळ होते, अपचन पोटात वात धरतो. पोट सतत फुगल्यासारखे वाटते. मळमळ, उलट्या, ताप येतो. पोटात विशेषतः वरच्या भागात उजव्या बाजूला हात लावल्यावर दुखणे. शौचाचा रंग फिका किंवा मातकट दिसतो.

उपायवजन आटोक्यात ठेवणे हा पित्ताशयावरील एक उत्तम उपाय आहे. मात्र वजन कमी करताना ते जलद गतीने करू नका नाहीतर त्याचे दुष्परिणाम होतील. रोज व्यायाम करा आणि अँटीइन्फेमेंटरी डाएट घ्या.या शिवाय त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स