symptom of liver damage : लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याद्वारे शरीरातील अनेक कामे केली जातात. जसे की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं, पोषक तत्वांचं पचन आणि प्रोटीन तयार करणं. दारूचं अधिक सेवन, हेपेटायटिससारख्या इन्फेक्शनमुळे, फॅटी लिव्हर डिजीज, ऑटोइम्यून आजार, काही औषधं किंवा विषारी पदार्थ लिव्हर खराब करतात.
लिव्हर खराब झाल्याचे संकेत
लिव्हर खराब झाल्याची कारणे आणि लक्षण व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात. मेयोक्लीनिकनुसार, लिव्हर खराब झाल्यावर सामान्यपणे काविळ होणं कॉमन आहे आणि तुम्हाला काविळची काही लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
काविळ
काविळ झाल्यानंतर त्वचा आणि डोळ्यातील पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. असं तेव्हा होतं जेव्हा लिव्हर आपलं काम योग्यपणे करू शकत नाही आणि शरीरात बिलीरूबिन नावाचा कचरा जमा होतो. काविळ लिव्हर खराब होत असल्याचा संकेत असू शकतो.
सतत थकवा
जर तुम्ही पुरेशी झोप घेतल्यावरही तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल किंवा कमजोरी असल्यासारखं वाटत असेल तर हा लिव्हर खराब होत असल्याचा संकेत असू शकतो. लिव्हर शरीरात ऊर्जा तयार कऱण्यात महत्वाची भूमिका बजावतो. जर त्यानेच योग्यपणे काम केलं नाही तर थकवा आणि कमजोरी जाणवते.
पचनासंबंधी समस्या
लिव्हर खराब झाल्यावर पचनक्रिया प्रभावित होते. अशात मळमळ, उलटी होणे, भूक कमी लागणे किंवा विनाकारण वजन कमी होणे अशा समस्या होतात. काही लोकांना जुलाब किंवा विष्ठेचा रंग बदलणे अशा समस्या होतात.
पायांवर सूज
लिव्हर खराब झाल्यावर शरीरात तरल पदार्थ जमा होऊ शकतात. ज्यामुळे पायांवर सूज येऊ शकते. यासोबत वजन वेगाने वाढूही लागतं आणि शरीरात अस्वस्थ वाटू शकतं.