तुम्ही पाणी बसून पिता की उभं राहून? जर तुमचे उत्तर उभं राहून असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारे उभं राहून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात मग ते ऑफीस असो घर असो किंवा प्रवासात पाणी पिणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र वेळीच ही सवय मोडणे आरोग्यासाठी योग्य ठरेल… उभ्याने पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणकोणते धोके आहेत जाणून घेऊयात…पचनाचे विकारजेव्हा तुम्ही उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.
स्नायु व मज्जासंस्थेवर ताणउभं राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.
किडनीचे आजारउभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.
जळजळीचा त्रासउभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.
तहान भागत नाहीउभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.
(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)