आपल्या दररोजच्या दिनक्रमामध्ये जेवणाचा समावेश होतो. अनेकदा आपल्या लक्षात येतं की, जेवणाची वेळ झाली तरी भूकेचा काही पत्ताच नसतो. एकदा किंवा दोनदा असं घडलं तर ठिक आहे पण असं सतत घडत असेल तर मात्र फार गंभीर असू शकतं. भूक न लागणं हा आजार नसला तरिही अनेक आजार होण्याचं लक्षण आहे. त्याचं असं आहे की, आपण जे अन्न खातो ते एखाद्या इंधनाप्रमाणे काम करतं. जर भूक नाही लागली तर शरीर आजारी असण्याचं लक्षण असतं. जाणून घेऊया अशी कारण जी भूक मारण्यासाठी कारणीभूत ठरतात.
तणाव
जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरून तणाव घेत असाल तर त्यामुळेही तुमची भूक कमी होऊ शकते किंवा भूकच मरू शकते. कारण जेव्हा तुम्ही तणावग्रस्त असता त्यावेळी तुमचं शरीर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतं. तुमचा मेंदू एड्रेनालाईनसहित अनेक केमिरल्सना रिलिज करतं ज्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर होतो. परिणामी पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. जर तुम्ही खूप वेळापर्यंत तणावामध्ये राहत असाल तर तुमचं शरीर कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स प्रेरित करतं. त्यामुळे भूक लागते.
औषधांचं सेवन
भूक न लागण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे औषधांचं जास्त सेवन करणं. अनेक औषधांमुळे साईड इफेक्ट्स होतात. त्यामध्ये भूक न लागण्याचाही समावेश असतो. डिप्रेशन, मायग्रेन, रक्तप्रवाह, क्रोनिक ओब्सट्रेक्टिव पुल्मनेरी डिजीज (सीओपीडी) आणि पार्किंसन्स रोगावर औषध म्हणून वापरण्यात येणारी औषधं भूकेवर परिणाम करतात. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हायपोथायरायडिज्म
थायरॉइड एक एंडोक्राइन ग्लँड आहे जी बटरफ्लाय आकाराची असून गळ्यामध्ये असते. यामधून थायरॉइड हार्मोन्स तयार होत असतात. हे हार्मोन्स शरीरातील मेटाबॉलिज्म संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. जेव्हा हार्मोन्स योग्य प्रमाणात नसतात त्यावेळी शरीरातील उर्जेवर परिणाम होतो. यामुळे तुमच्या भूकेवरही परिणाम होतो.
एनीमिया
शरीरातील रक्तपेशी कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. याचं काम संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं हे असतं. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे सतत थकवा येतो आणि भूकही लागत नाही. याच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणं आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
पोटाच्या समस्या
पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांमुळेही भूकेवर परिणाम होतो. एखाद्या वायरल इन्फेक्शनमुळे किंवा बॅक्टेरियांमुळे पोटाच्या समस्या उद्भवतात. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही शक्य तेवढं शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
वाढतं वय
जसं जसं वय वढत जातं, तसा पचनक्रियेवरही परिणाम होतो. या दरम्यान व्यक्तीचं पोट भरल्याप्रमाणे वाटतं. तसेच त्यामुळे भूकेवरही परिणाम होतो. हार्मोनल परिवर्तन, क्रोनिक डिजीज आणि काही औषधांमुळे भूक कमी होते.
डिप्रेशन
डिप्रेशनमुळे मेंदूतील से कॉर्टिकोट्रोपिन-रिलीजिंग फॅक्टर (सीआरएफ) नावाचं एक हार्मोन रिलीज करतं. यामुळे तुमची भूक कमी होते. तसेच याच्या गंभीर समस्या उद्भवल्यास भूक लागत नाही.
अशी वाढवा भूक :
- तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी घेऊ शकता. त्यानंतर हलका ब्रेकफास्ट करा. ब्रेक फास्टमध्ये सफरचंद, मोड आलेले चणे किव मूग यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
- एकत्रच खूप पदार्थ खाण्याऐवजी दर दोन तासांनी हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा.
- जेवणामध्ये अधिक तेल, मसाल्यांऐवजी हलक्या पदार्थांचा आहारमध्ये समावेश करा. ही सवय तुमच्या पोटाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करेल.
- आपल्या लाइफ स्टाइलमध्ये व्यायाम करा. रात्री जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका.
- चाय-कॉफी, सिगरेट इत्यादी पदार्थांमुळेही भूक कमी होते. अशा पदार्थांचे जास्त सेवन करत असाल तर असं करणं टाळा.
- रात्री उशीरापर्यंत टीव्ही किंवा फोनचा वापर करणं टाळा. त्याऐवजी झोप पूर्ण करा.