शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

CoronaVirus: दुहेरी मास्क कोरोनापासून वाचविणार, अधिक संरक्षण; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 7:07 AM

use of two mask will save from corona? yes... नियमांचे पालन करणे आवश्यकच. अवघड काळात दुहेरी मास्‍क घातल्‍यामुळे विषाणूपासूनच्‍या संरक्षणामध्‍ये वाढ होते आणि विषाणूचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता कमी हेाते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. हा विषाणू आता अधिक संक्रमित व संसर्गित आहे. अलीकडील वाढत्‍या प्रादुर्भावामुळे आपल्‍या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करायला हवे, ज्‍यामध्‍ये मास्‍क घालणे, सोशल डिस्टिन्सिंग राखणे, हात स्‍वच्‍छ धुणे व सॅनिटाइज करणे यांचा समावेश आहे. मास्कचा वापर करताना ताे जर दुहेरी असेल तर अधिक संरक्षण हाेते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.

अवघड काळात दुहेरी मास्‍क घातल्‍यामुळे विषाणूपासूनच्‍या संरक्षणामध्‍ये वाढ होते आणि विषाणूचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता कमी हेाते. सेंटर्स फॉर डीसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्‍हेंशन (सीडीसी) येथे नुकतेच करण्‍यात आलेल्‍या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीने दुहेरी मास्‍क घातला तर कोविडचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता ९६.४ टक्‍क्‍यांनी कमी हेाऊ शकते, त्यामुळे दुहेरी मास्क उपयुक्त असल्याचे इन्‍फेक्शिअस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. कीर्ती सबनीस यांनी सांगितले.

जेव्‍हा एखादी व्‍यक्‍ती एका मास्‍कवर दुसरा मास्‍क घालते तेव्‍हा त्‍याला दुहेरी मास्‍क घालणे असे म्‍हणतात. बाहेरील मास्‍क आतील मास्‍कच्‍या कोपऱ्यांवर सौम्‍य दबाव निर्माण करून उत्तम सीलबंद करू शकतो. विषाणू श्‍वसनमार्गावाटे बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्सच्‍या माध्‍यमातून पसरत असल्‍यामुळे मास्‍कचा हा दुहेरी स्‍तर फिल्‍ट्रेशन वाढवण्‍यामध्‍ये मदत करू शकतो. व्‍यक्‍ती शिंकल्‍यास किंवा खोकल्‍यास संरक्षण करू शकतो.

दुहेरी मास्‍क कसा व कधी घालावाnविमानतळ, बस स्‍टॅण्‍ड अशा गर्दीच्‍या ठिकाणी जाताना, तसेच कामानिमित्त प्रवास करण्‍यासाठी सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करताना दुहेरी मास्‍क घालावा.nएका सर्जिकल मास्‍कवर कापडी मास्‍क किंवा दोन कापडी मास्‍क किंवा ३ - प्‍लाय मास्‍कवर एक कापडी मास्‍क हे संयोजन उपयुक्‍त आहे.nअत्‍यंत गर्दीच्‍या ठिकाणी मास्‍कसोबत फेस शील्‍ड वापरता येऊ शकते.nएन-९५ मास्‍क वापरत असाल तर दुहेरी मास्‍क घालणे टाळावे.nमुलांनी दुहेरी मास्‍क घालणे टाळावे.

मास्‍क घालताना हे कराnदररोज गरम पाण्‍याने कापडी मास्‍क स्‍वच्‍छ धुवा.nनाक, तोंड व हनवुटीला व्‍यापून घेत मास्‍क योग्‍यरीत्‍या घाला.nकुटुंबामधील सदस्‍यांसोबत मास्‍क शेअर करणे टाळा.nकोणताही मास्‍क काढल्‍यानंतर हात सॅनिटाइज करा.nठरावीक अंतराने मास्‍क बदलून नवीन मास्‍क घाला.nबंदिस्‍त कचऱ्याच्या डब्‍यामध्‍येच खराब झालेला मास्‍क टाका.

अवघड काळात दुहेरी मास्‍क घातल्‍यामुळे विषाणूपासूनच्‍या संरक्षणामध्‍ये वाढ होते आणि विषाणूचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता कमी हेाते. सेंटर्स फॉर डीसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्‍हेंशन (सीडीसी) येथे नुकतेच करण्‍यात आलेल्‍या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीने दुहेरी मास्‍क घातला तर कोविडचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता ९६.४ टक्‍क्‍यांनी कमी हेाऊ शकते, 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस