लांबचा प्रवास आणि तासन्तास होणारं ट्रॅफिक जॅम यामुळे आपल्याला मानसिक त्रास तर होतोच. सोबतच अशात जर अचानक टॉयलेटचं प्रेशर आलं तर फारच अवघड स्थिती निर्माण होते. कधी-कधी असं होतं की, अचानक प्रवासादरम्यान आलेलं हे नैसर्गिक प्रेशर हलकं करण्यासाठी जागा आणि वेळही मिळत नाही. अशावेळी एक ट्रिक तुमच्या कामाला येऊ शकते. चला जाणून घेऊ काय आहे ही ट्रिक.
अचानक ओढवलेली प्रेशरची स्थिती कशी सांभाळायची हे अनेकांना माहीत नसतं. प्रेशर इतकं आलेलं असतं की, डोकंही काम करणं बंद करतं. फक्त एकच गोष्ट डोक्यात चालू असते. ती म्हणजे एकदाचं टॉयलेट कुठे सापडेल आणि कधी एकदाचं हलकं होता येईल. मात्र, प्रेशर रोखून ठेवण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी स्वत: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. बिंदेश्वर पाठक यांनीच एक कमालीची ट्रिक सांगितली आहे.
डॉ. बिंदेश्वर पाठक हे अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात आले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना प्रेशरबाबत प्रश्न विचारला. त्यावर डॉ. पाठक यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, बोटांच्या खाली दुसऱ्या हाताच्या बोटांनी अॅंटीक्लॉक वाइज दाबावे. काही वेळ असं करत राहिल्याने प्रेशर तब्बल २ तासांसाठी कंट्रोल करता येऊ शकतं. या पद्धतीला एक्यूप्रेशर असं म्हणतात. डॉ. पाठक म्हणाले की, त्यांनी स्वत: अनेकदा ही ट्रिक वापरली आहे.
डॉ. बिंदेश्वर पाठक हे सुलभ इंटरनॅशनलचे फाउंडर आहेत. त्यांनी लोकांनी उघड्यावर बसू नये म्हणून खूप काम केलेलं आहे. यासाठी ते अजूनही काम करत आहेत.