Blood Cleaning Remedies : रक्त शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत ऑक्सीजन आणि पोषक तत्व पोहोचवण्याचं काम करतं. पण आपल्याच काही चुकांमुळे रक्तात विषारी तत्व किंवा नुकसानकारक पदार्थ जम होतात. ज्यामुळे रक्त अशुद्ध होतं. रक्त अशुद्ध झालं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
रक्त अशुद्ध झाल्याची लक्षणं
रक्तामध्ये विषारी तत्व जमा झाल्यानं तुम्हाला त्वचा आणि केसांसंबंधी समस्या, पचनासंबंधी समस्या, थकवा, कमजोरी, पुन्हा पुन्हा इन्फेक्शन, तोंडाची दुर्गंधी, लघवी-घामातून दुर्गंधी, झोप न लागणं आणि मानसिक तणाव अशी लक्षणं दिसू लागतात.
रक्त शुद्ध करण्याचा उपाय
डॉक्टर सलीम जैदी यांनी रक्त शुद्ध करण्याचा एक सोपा आणि नॅचरल उपाय सांगितला आहे. अशुद्ध झालेलं रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे खर्च करण्याची किंवा महागडं टॉनिक घेण्याची गरज पडणार नाही. तुम्ही एक घरगुती उपाय करूनही रक्त शुद्ध करू शकता. रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या पानांचा वापर करू शकता.
४ पट वेगानं शुद्ध होतं रक्त
डॉक्टरांनी सांगितलं की, कडूलिंबाच्या पानांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात, त्यामुळे ही पानं एक नॅचरल डिटॉक्सिफायर ठरतात. या पानांचा वापर करून तुमचं रक्त शुद्ध होतं, इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि त्वचाही चमकदार होते. या पानांच्या मदतीनं केवळ २ मिनिटांमध्ये ४ पट वेगानं रक्त शुद्ध होतं.
कडूलिंबाचे फायदे
कडूलिंबाला आयुर्वेदात सगळ्यात शक्तीशाली औषधी मानलं आहे. यानं रक्तात जमा झालेले विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. तसेच कडूलिंबाच्या पानांनी लिव्हर आणि किडनी डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. तसेच कडूलिंबामधील अॅंटी-वायरल आणि अॅंटी-फंगल गुणांमुळे शरीराची इम्यूनिटी वाढते. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.
कडूलिंबाच्या पानांचा रस
१० ते १५ कडूलिंबाची ताजी पानं घ्या आणि ते बारीक करून अर्धा ग्लास पाण्यात मिक्स करून प्या. हा रस तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता. या रसानं रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि त्वचेसंबंधी अनेक समस्याही दूर होतात.
पानं चावून खा
रोज सकाळी ४ ते ५ कडूलिंबाची पानं चावून खाल्ल्यासही रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. तसेच इम्यूनिटीही बूस्ट होते. तुम्ही कडूलिंबाच्या पानांचा चहा सुद्धा पिऊ शकता. ५ ते ६ कडूलिंबाची पानं १ ग्लास पाण्यात उकडून घ्या. हे पाणी गाळून पिऊ शकता. यानं लिव्हर डिटॉक्स होईल, पचन तंत्र मजबूत होईल आणि वजनही कमी होईल.