चित्रपट, मालिकांमधील अभिनेत्रींची त्वचा पाहून तुम्हालाही तशी त्वचा हवीशी वाटत असेल. यासाठी एक काढा रामबाण उपाय ठरू शकतो. पण हा काढा फक्त त्वचाच चमकदार बनवत नाही तर या काढ्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
तुम्ही गुळवेल या औषधी वनस्पती बद्दल ऐकलंय का? कुंपणावर, बागेत, रानात अगदी कुठेही ही गुळवेल सहज उपलब्ध असते. या गुळवेलीचा काढा तुम्ही प्याल तर त्वचा तर चमकेलच पण तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
कसा बनवाल गुळवेलीचा काढा?एका भांड्यामध्ये दोन कप पाणी टाका. त्यात गुळवेलीच्या सुकलेल्या एक-दोन काड्या टाका. हे पाणी अर्धे होईपर्यंत गॅसवर उकळा. स्वच्छ कपड्याने गाळून घ्या. झाला गुळवेलीचा काढा तयार हा काढा थोडा कडू असतो. त्यात तुम्ही चवीसाठी मध, सैंधव मीठ किंवा आलं घालू शकता.
या काढ्याचे फायदेत्वचा चमकदार होते- हा काढा तुमच्या त्वचेला डिटॉक्स करतो. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते- गुळवेलीच्या काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. दिवसातून दोन वेळा हा काढा प्यायल्यास लाभदायक ठरतो.
हृदयविकाराचा धोका कमी होतो
अपचनाची समस्या दूर होते
डोळ्यांचे स्वास्थ्य चांगले राहते.
मनावरील ताण कमी होतो.
रक्तशुद्धीकरण होते.