Weight Loss Drink : पोटात चरबी जमा झाल्यावर वजन वाढतं, पोट बाहेर येतं आणि शरीर वेगवेगळ्या आजारांचं घर बनतं. लठ्ठपणा वाढल्यावर वेगवेगळी कामं करण्यात समस्या तर येतेच, चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. अनेक गंभीर आजारांचा धोका अधिक वाढतो. डॉक्टर लठ्ठपणाला डायबिटीस, हृदयरोग आणि कॅन्सरसारख्या आजारांचं मुख्य कारण मानतात.
लठ्ठपणा कमी करण्याची ईच्छा अनेकांची असते. पण बिझी लाइफस्टाईलमुळे अनेकांना घरी एक्सरसाईज करण्यासाठी किंवा जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, शारीरिक हालचाल, योग्य लाइफस्टाईलसोबतच काही घरगुती उपाय केले तरी तुम्ही वजन कमी करू शकता.
डॉक्टर निशांत गुप्ता यांनी वजन कमी करण्याचा एक सोपा घरगुती सांगितला आहे. जो १५ दिवसात प्रभाव दाखवू शकतो, असा त्यांनी दावा केला आहे. यानं तुमच्या पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासोबत चेहराही खुलवण्यास मदत मिळेल.
काढा बनवण्याचं साहित्य
एक चमचा कापलेलं आलं
दोन तुकडे दालचीनी
२ वेलची
अर्धा चमचा बेडीशेप
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा जिरे
कसा बनवाल काढा?
२ ग्लास पाण्यात या सगळ्या गोष्टी टाका
५ मिनिटं हे पाणी चांगलं उकडू द्या
त्यानंतर हे पाणी हलकं थंड होऊ द्या आणि गाळून घ्या
त्यानंतर यात अर्ध्या लिंबाचा रस टाका
१५ दिवसात कमी होईल वजन
डॉक्टरांनुसार वजन कमी करणारं हे ड्रिंक सतत १५ दिवस प्यायचं आहे. याने पोटातील चरबी गळून बाहेर पडेल आणि लठ्ठपणा कमी होईल. लठ्ठपणा कमी झाल्यास चेहऱ्याचं सौंदर्यही खुलेल.