किडनी स्टोन ही एक वेदनादायक समस्या आहे. त्याचा त्रास कोणालाही होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत याला नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) किंवा युरोलिथियासिस (Urolithiasis) असेही म्हणतात. किडनी स्टोन (Kidney Stones) म्हणजे खनिजं आणि क्षारांनी बनलेले कठीण पदार्थ असतात. अनियंत्रित आहार, वाढलेलं वजन, एखादा रोग, काही सप्लिमेंट्स किंवा औषधं यांमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोन तुमच्या मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत आपला डाएट प्लॅन खूप विचारपूर्वक आखावा लागतो. किडनी स्टोनची समस्या असेल तर काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने हा त्रास कमी होऊ शकतो. यासंबंधीची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे. किडनी स्टोनच्या समस्येवर काही घरगुती उपाय करू शकता. त्याची माहिती येथे देत आहोत.
लिंबाचा रसलिंबू हे पोटाच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरते. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असतं. तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर लिंबाच्या रसाचं सेवन केल्यास तुमचा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. यानंतर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि याचं सेवन करा. त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
अॅपल सायडर व्हिनेगरअॅपल सायडर व्हिनेगरमध्ये (Apple Cider Vinegar) अॅसिटिक अॅसिड असतं. ते अॅसिड किडनी स्टोन विरघळण्यास मदत करतं. अॅपल सायडर व्हिनेगर किडनी स्टोनमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतं. यासाठी शुद्ध पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून हे मिश्रण दिवसभर प्यावं. अॅपल सायडर व्हिनेगर किडनी स्टोनची निर्मिती कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे; मात्र त्यावर सखोल संशोधन झालेलं नाही.
टोमॅटोचा रसकिडनी स्टोन शरीरातून बाहेर काढण्यासाठी टोमॅटोचा रसदेखील (Tomato juice) उपयुक्त आहे. यासाठी दोन टोमॅटो चांगले धुऊन बारीक करून घ्या. त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळून त्याचं सेवन करा. तुम्ही हे मिश्रण तयार करून फ्रीजमध्येदेखील साठवून ठेवू शकता. हवं असेल तेव्हा रस स्वरूपात याचं सेवन करावं.
ओवाओव्याचा रस किडनी स्टोनच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास उपयुक्त ठरतो. बऱ्याच काळापासून पारंपरिक औषधांमध्ये ओव्याचा वापर जातो. ओवा पाण्यात मिसळून तयार झालेल्या रसायनाचं दिवसभर सेवन करावं. हे मिश्रण शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतं.
तुळशीची पानंकिडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांपासून बनवलेला रस उपयुक्त ठरतो. तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात एक चमचा मध घालावा. या तयार केलेल्या मिश्रणाचे सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावं. असं केल्याने किडनीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.