Herbal Tea For Body Detox: शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघत नसतील म्हणजे बॉडी डिटॉक्स होत नसेल तर हे विषारी पदार्थ तुमच्या शरीरात जमा होऊ लागतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो गायब होतो. त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात आणि इतरही काही समस्या होतात.
तसे तर बॉडी डिटॉक्स करण्याचे अनेक उपाय आहेत. पण तुम्ही फार सहजपणे आणि फार जास्त मेहनत घेताही रक्तातील विषारी पदार्थ स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला डाएटमध्ये काही हर्बल चहांचा समावेश करावा लागेल. ज्याने बॉडी आणि रक्त दोन्हीही डिटॉक्ट होईल. अशात आम्ही तुम्हाला रक्त स्वच्छ करणाऱ्या काही चहांबाबत सांगणार आहोत.
तुळशीचा चहा - तुळशी रक्त साफ करण्याचं काम सहजपणे करू शकता. रोज तुळशीची 10 ते 12 पाने तुमचं रक्त शुद्ध करण्यास तुमची मदत करू शकतात. तुळशीचा चहा करण्यासाठी 1 ग्लास पाणी घ्या. त्यात 10 ते 12 तुळशीची पाने टाका. पाणी जेव्हा अर्ध शिल्लक राहील तेव्हा ते गाळून चहासारखं एक एक घोट प्यावं. हा चहा तुम्ही सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळ घेऊ शकता.
लिंबाचा चहा - लिंबूही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. यातील व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स शरीरातील रक्त शुद्ध करण्यासोबतच पचनतंत्रही मजबूत करण्याचं काम करतात. लिंबाचा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात थोडी चहा पावडर टाका आणि ते उकडून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यात अर्ध लिंबू पिळा. याचं तुम्ही रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
दालचीनी आणि गुळाचा चहा - दालचीनी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हा स्पेशल चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात दालचीनीचा छोटा तुकडा टाका आणि एक तुकडा गूळ टाका. पाणी जेव्हा अर्ध राहील तेव्हा ते गाळून पिऊ शकता.
(टिप : वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्हाला काही समस्या असेल किंवा आजार असेल तर या हर्बल चहाचं सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा. कारण काही लोकांना याचे साइड इफेक्टही होऊ शकतात.)