Weight Loss Drink : आजकाल अनेक लोकांना वजन वाढण्याची समस्या होत आहे. याला कारण चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल आहे. जर आहारावर वेळीच लक्ष दिलं नाही तर वजन लगेच वाढतं. जे कमी करणं फारच अवघड होऊन बसतं. त्यामुळे वेळीच काहीतरी उपाय करायला हवेत.
तुमचंही वजन वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर एक असं डिटॉक्ट ड्रिंक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. डायटिशिअन मंजू मलिक यांनी या नाईट डिटॉक्स ड्रिंकबाबत इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही रात्री झोपण्याआधी पिऊ शकता.
वजन कमी करणारं डिटॉक्स ड्रिंक
डायटिशिअनुसार, हे डिटॉक्स ड्रिंक पिऊन तुमचं केवळ वजनच कमी होणार नाही तर मसल्स क्रॅप्सची समस्या दूर होईल आणि तुमची पचनासंबंधी समस्याही दूर होईल.
कसं बनवाल हे ड्रिंक
हे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला पुदीन्याची पाने, बडीशेप आणि आपल्याची गरज पडेल. एक चमचा बडीशेपच्या दाण्यांमध्ये एक तुकडा आलं टाका आणि ते बारीक करा. एक कप पाणी कमी आसेवर गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात बडीशेफ आणि आल्याचं बारीक केलेलं मिश्रण टाका. हे काही वेळ उकडू द्या. गॅस बंद करून त्यात काही पुदीन्याची पाने टाका. हे पाणी कोमट झाल्यावर गाळून सेवन करू शकता.
इतर काही फायदेशीर ड्रिंक्स
डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. असंच एक डिटॉक्स ड्रिंक म्हणजे मध आणि दालचीनी. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचीनी पावडर किंवा एक दालचीनीची एक काडी टाकून उकडला. हे पाणी एका कपमध्ये गाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून याचं सेवन करा.
लिंबू आणि आल्याचं डिटॉक्स ड्रिंकही पिऊ शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एक कप पाण्यात आलं टाकून उकडा आणि नंतर हे गाळून त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. तुम्ही यात मधही टाकू शकता.