Bad Cholesterol Home Remedies: आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे जास्तीत जास्त लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. कमी वयातच लो हाय कोलेस्ट्रॉलचे शिकार होत आहेत. कोलेस्ट्रॉल शरीरातील एक मेणासारखा पदार्थ असतो. शरीरात गुड आणि बॅड असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. गुड कोलेस्ट्रॉलची आपल्या शरीराला गरज असते. पण जर बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढलं तर रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्त पुरवठा योग्यपणे होत नाही. अशात तुम्हाला हार्ट अटॅक, ब्लॉकेज, स्ट्रोक आणि कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका असतो.
अशात शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं असतं. बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो. एक्सरसाइज करावी लागते. तसेच काही घरगुती उपयांनीही तुम्ही कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करू शकता. आज असाच घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे हळदीचं पाणी.
कोलेस्ट्रॉल कमी करतं हळदीचं पाणी
शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हळदीचं पाणी फार फायदेशीर ठरतं. हळदीच्या पाण्याने शरीरातील रक्तही शुद्ध होतं आणि शरीरातील विषारी पदार्थ किंवा तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. हळदीमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. हळदीमुळे शरीराच्या आतील सूज कमी होण्यासही मदत मिळते.
कसं प्याल हे पाणी
हळदीचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यात चिमुटभर हळदीचं पावडर टाका. हे पाणी मिक्स करा आणि याचं सेवन करा. हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. याने तुम्हाला कोलेस्ट्रॉल लवकर कमी करण्यास मदत मिळेल. सोबतच हळदीचे अनेक फायदेही शरीराला मिळतील. याने तुमचा इन्फेक्शनपासूनही बचाव होईल.