झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून कंटाळा आलाय का? मग इतर उपायांसोबतच खाण्या-पिण्याच्या वेळाही पाळणं ठरतं आवश्यक. जर तुम्ही योग्य वेळी डाएट घेत नसाल किंवा पाणी पित नसाल तर वजन कमी करण्याचे तुमचे सर्व उपाय व्यर्थ ठरतील. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं की, ज्या व्यक्ती पाणी पिण्याच्या वेळा पाळत असतील, त्यांचं वजन कमी होण्यास फायदा होतो. तसेच ज्या व्यक्ती पाणी पिण्याच्यावेळा पाळत नाहीत, त्यांची वजन कमी करण्याची प्रक्रिया फार संथ गतीने होते.
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे विशेष योगदान असते. ही गोष्ट आपल्यापैकी सर्वचजणांना माहीत आहे. पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ही बाब लक्षात घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण जर पाणी पिण्याची वेळ योग्य असेल तर झटपट वजन कमी करण्यास मदत होते.
झटपट वजन कमी करण्यासाठी कधी प्याल पाणी?
जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला जेवण्याआधी 30 मिनिटं कमीत कमी अर्धा लीटर पाणी पिणं आवश्यक ठरतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते.
पाणी पिण्याची वेळ पाळणं का आहे आवश्यक?
यावर अनेक संशोधनं करण्याक आली आहेत. त्यातून सिद्ध झाल्यानुसार, जर तुम्ही काहीही खाण्याआधी पाणी पित असाल तर तुम्ही जास्त जेवणं टाळता. जेव्हा आपल्याला तहान लागते, ती आपल्या शरीराची भूक असते. जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा शरीर पाण्यामार्फत शरीराच्या गरजा पूर्ण करतं. ज्यामुळे जेव्हा तुम्ही जेवता, तेव्हा जास्त जेवण करण्यापासून दूर राहाता.
Obesity जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्ती जेवणाअगोदर जवळपास अर्धा लीटर पाणी पितात. त्या 12 आठवड्यांमध्ये कमीत कमी 1.5 किलोपर्यंत आपलं वजन कमी करतात.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी पाणी का ठरतं महत्त्वपूर्ण?
शरीरामध्ये जेव्हा अतिरिक्त फॅट्स जमा होतात. तेव्हा या गोष्टीला लठ्ठपणा म्हणतात. जगभरात सर्वात जास्त लठ्ठपणा हा पोटाच्या चरबीचा असतो. या समस्येचं मुख्य कारण आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि एक्सरसाइज न करणं.
परंतु, जेव्ह तुम्ही लठ्ठपणा कमी करण्याचा पर्यत्न करत असाल, तेव्हा डाएट वेळेवर घ्या. अनेक डाएट एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, हेल्दी डाएट तेव्हाच फायदेशीर ठरते. जेव्हा ते योग्य वेळी घेतलं जातं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.