Coconut water side effects: नारळाचं पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यात अजिबात काही कन्फ्यूजन नाही. पण अनेकांना प्रश्न पडतो की, हिवाळ्यात नारळांच पाणी प्यावं की नाही? चला जाणून घेऊ अनेकांना असलेल्या या प्रश्नाचं उत्तर...
असं म्हणतात की, एक ग्लास नारळाचं पाणी एका ग्लास नॉर्मल पाण्याच्या बरोबर असं. पण थंडीच्या दिवसात हे पाणी प्यायल्याने काही नुकसान होतं की नाही याबाबत लोकांमध्ये कन्फ्यूजन असतं. चसा जाणून घेऊ याचे नुकसान....
सर्दी आणि खोकला : थंडीच्या दिवसात सकाळी आणि सायंकाळी नारळाचं पाणी प्यायले तर सर्दी आणि खोकल्याची समस्या होण्याचा धोका असतो. एक्सपर्ट्स सांगतात की, नारळाचं पाणी थंड असतं, त्यामुळे थंडीच्या दिवसात हे दुपारी प्यावं.
ब्लड प्रेशर : थंडीच्या दिवसात ब्लड प्रेशर जास्त प्रभावित होतं. या दरम्यान नारळाचं पाणी पिऊ नये. नारळाच्या पाण्यात ब्लड प्रेशर डाउन करण्याचे गुण असतात. पण जास्त पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर हाय सुद्धा होऊ शकतं.
लूज मोशन : हे तर सत्यच आहे की, कोणत्याही गोष्टीची अति केली तर शरीरासाठी नुकसानकारकच असते. त्यानुसार जर नारळाचं पाणी जास्त प्याल तर लूज मोशनची समस्या होऊ शकते. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढलं की असं होतं.