सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे प्रत्येकजण थंड पाणी पितो. थंड पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. असं तुम्हाला वाटत असेल तर फायद्यांबरोबरच थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. उर्जा देण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पाणी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात.
सर्दी- खोकला
फ्रिजचं पाणी हे नैसर्गिकरित्या नाहीतर कृत्रिमरित्या थंड होतं. जे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक्षमतेला नुकसानकारक असतं. फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, परिणमी आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.
वजन कमी होत नाही
जर तुम्हाला बारिक व्हायचं असेल तर थंड पाणी पिणं योग्य नाही. कारण गरम पाणी किंवा माठातल्या पाण्याचं सतत सेवन केल्याने तुम्ही वजन कमी करू शकता. वजन कमी न होणं. तज्ज्ञांनुसार फ्रिजमधील थंड पाणी प्यायलाने आपल्या शरीरात साचलेलं फॅट अजूनच कडक होतं. ज्यामुळे फॅट बर्न करण्यास समस्या निर्माण होते.
हृदयासाठी घातक
थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. खरंतर या नर्व्हला आपल्या शरीरातील सर्वात लांब म्हणजे कार्निवल नर्व्ह असंही म्हणतात. जी आपल्या मानेपासून हृदय, फुफुस्स आणि पचनसंस्था कंट्रोल करते. म्हणून थंड पाणी प्यायल्याने हद्यावर नकारात्मक परिणाम पडून हृद्यासंबंधी वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
पोट साफ होण्यास त्रास
थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंदावते. तसंच आतड्या आकुंचन पावतात. जेवण नीट पचन नाही त्यामुळे पोट साफ होण्याची समस्या उद्भवते. त्यासाठी शक्यतो गरम किंवा माठातलं पाणी प्या.