Coriander Water Benefits: घराच्या किचनमध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या गोष्टी असतात. पण त्यांबाबत अनेकांना माहीत नसतं. अशीच गोष्ट म्हणजे धणे. धण्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी वापर केला जातो. पण अनेकांना याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतात. धण्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशिअम, फायबर आणि अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्ही धणे पाण्यात भिजवून हे पाणी प्याल तुम्हाला वजन कमी करण्यापासून इतरही अनेक फायदे मिळतील. चला जाणून घेऊ धण्याचं पाणी पिण्याचे फायदे...
शरीरातील सूज कमी होते
धण्याच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जसे की, फ्लावोलॉयड्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. धण्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूजही कमी होते.
पचन तंत्र चांगलं राहतं
रोज सकाळी जर तुम्ही धण्याचं पाणी प्याल तर पचन तंत्र चांगलं राहतं. धण्याच्या बियांमध्ये अॅक्टिव एंझाइम्स असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखीही दूर होते.
वजन निंयत्रित राहतं
धण्याचं पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहतं. यात फायबर भरपूर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतं. याने अन्न पचण्यास मदत मिळते आणि याने पोट जास्त वेळ भरून राहतं.
हृदयासाठी फायदेशीर
धण्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबरही भरपूर असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या पाण्याचं सेवन केल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.
विषारी पदार्थ बाहेर पडतील
धण्यांचं पाणी प्यायल्याने किडनी साफ होण्यास मदत मिळते. लघवीसंबंधी समस्या होतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थही लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात.