यात जराही शंका नाहीये की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. कारण रात्री ७ ते ८ तासांच्या झोपेनंतर शरीराला हेल्दी आणि न्यूट्रिशनने भरपूर डाएटची गरज असते. हेल्दी ब्रेकफास्ट केवळ शरीराचं मेटाबॉलिज्मच नाही तर शरीरातील कॅलरीही बर्न करतो. पण तुम्ही जर वजन कमी करण्याच्या मागे लागला असाल तर सकाळी हेल्दी नाश्ता आणि एक कप कॉफीने दिवसाची सुरुवात करा. याचा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.
फॅट बर्न करते कॉफी
सकाळी नाश्त्यासोबत १ कप कॉफी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कॉफी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म रेट वाढतो, याने शरीराची हीट आणि एनर्जी दोन्ही वाढवण्यास मदत मिळते. आणि याने शरीरातील फॅट बर्न होऊन वजन कमी होतं. सोबतच कॉफी प्यायल्याने एकाग्रताही वाढते.
भूक कमी करते
अनेक अभ्यासातून हे समोर आलं आहे की, कॉफी प्यायल्याने भूक कमी होते. पण याचा अर्थ हा नाही की, जेवणाला रिप्लेस करुन कॉफीचं सेवन करावं. हीट आणि एनर्जी वाढल्याने भूक कमी होते आणि क्लोरोजेनिक अॅसिड शरीरातील भूक वाढवणारे हार्मोन्स कमी करण्यास मदत करतात.
कमी करावं कॉफीचं सेवन
वजन कमी होतं म्हणून दिवसरात्री कॉफीचं सेवन करणे चुकीचं ठरतं. प्रमाणापेक्षा जास्त कॉफीचं सेवन केल्याने कॉफीचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि शरीराला ती सहनही होणार नाही. त्यामुळे याचा सकारात्मक प्रभाव दिसू शकणार नाही.
कॉफी पिण्याचे फायदे
जर्नल ऑफ एपिडेमॉलजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक प्रत्येक दिवशी कॉफी पितात त्यांचं वजन वाढण्याची शक्यता कमी असते. सोबतच टाइप २ डायबिटीजचा धोकाही कमी असतो. पण या केवळ कॉफी प्यायल्याने वजन कमी होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटवरही लक्ष द्यावं लागेल. एकीकडे वजन कमी करण्यासाठी कॉफीचं सेवन आणि दुसरीकडे फास्ट फूडचं सेवन असं चालणार नाही.