शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
3
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
4
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
5
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
6
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
7
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
8
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
9
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
10
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
11
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
12
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
13
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
15
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
16
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
17
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
18
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
19
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
20
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत

पोटभरीचे पिणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:02 AM

भूक लागल्यावर पोटभरीचं खायला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण खाण्यापेक्षा असं पोटभरीचं प्यायला मिळालं तर... असं ड्रिंक म्हणजे फ्रिकशेक्स.

भूक लागल्यावर पोटभरीचं खायला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण खाण्यापेक्षा असं पोटभरीचं प्यायला मिळालं तर... असं ड्रिंक म्हणजे फ्रिकशेक्स.आॅफिसमध्ये भूक लागली किंवा शॉपिंगला गेल्यावर भूक लागली तर आपसूकच खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे आपली पावलं वळतात. मग ठिकाण पाहून पदार्थ खाल्ले जातात. आणि खाताना एखादं पेय तर हल्ली मस्टच. लोकांची हीच आवड लक्षात घेत खाद्यपदार्थांबरोबरीने पेयांचेही विविध प्रकार मिळणारे कॅफे, लाऊंज सध्या तुफान चालत आहेत. तिथले काही प्रकार पितापिता त्यातले पदार्थही तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे दुसरी वेगळी डिश मागवण्याची गरजच उरत नाही. हा पितापिता खाऊही घालणारा भन्नाट प्रकार म्हणजे फ्रिकशेक्स.फ्रिकशेक्स हा प्रकार दोन वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलियातल्या एका टीव्ही शोमुळे तिकडे फारच लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याचे लोण जगभरात पोहोचायला लागले. फ्रिकी म्हणजे झोप उडवणारे असा त्याचा मूळ अर्थ. ग्लासमध्ये कुठलीही सजावट न करता भरभरून आणि ताळमेळ नसलेले कुठलेही म्हणजे कुठलेही पदार्थ त्यात देता येतात. मिल्कशेकची ही पुढची पायरी आहे असे म्हटले तरी चालेल.याविषयी शेफ निरज लवाटे म्हणाला, सध्या या फ्रिकशेक्सची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. हे पेय करताना मोठ्या ग्लासमध्ये आतमधून चॉकलेट सॉसचं कोटिंग करतात.आतमध्ये पाहिजे त्या फ्लेवरचं मिल्कशेक असते. त्यावर आइसक्रीमचा भलामोठा स्कूप, व्हीप क्री, वर आॅरियो बिस्कीट, चॉकलेटचा स्ट्रो, जेम्स, कॅडबरी, मार्शमेलोज, वफल्स, केक ते पॉपकॉर्नपर्यंत वाट्टेल ते भरपूर भरलेलं असतं. ते बघूनच आ वासला जातो. आणि हे सगळं एकट्यानं कसं प्यायचं असं होऊन जातं. एवढा मोठ्ठा भरलेला जार दोन माणसं सहज पिऊ शकतात. भन्नाट काहीतरी प्यायला मिळत असल्याने त्याची क्रेझ तरुणाईमध्ये जास्त असल्याचे निरजने सांगितले.सध्या मुंबई आणि उपनगरात निवडक हॉटेल्समध्ये मिळणारे हे शेक्स ३५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. किंमत बघून चकित व्हायला होतंच; पण याची मजा ते प्यायलाशिवाय कळणारच नाही! वेगळा प्रकार म्हणून हे फ्रिकशेक्स नक्की पिऊन बघा.भक्ती सोमण