शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

Health tips: रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीराच्या 'या' भागावर होतो गंभीर परिणाम, वेळीच थांबवा ही सवय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 1:25 PM

रात्रभर तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात जे चहा पिताना पोटात जातात, जे चांगले बॅक्टेरियांना त्रास देतात, ज्यामुळे चयापचय परिणाम होतो आणि पोटात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.

आपल्यापैकी अनेकांना सकाळी (Morning) उठल्याबरोबर एक-दोन कप चहा (Tea) प्यायला आवडतो. अनेकांच्या जणू अंगवळणी पडलेली ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. द हेल्थ साइटच्या मते, संशोधनात असं आढळून आलं आहे की, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी अशी कॅफिनयुक्त पेय प्यायल्यानं त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या तर निर्माण होतातच आणि चयापचय क्रियाही खराब होतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता, पोटात गॅस, उलट्या यांसारख्या समस्याही होऊ (Side Effects Of Drinking Tea In Morning On Empty Stomach ) शकतात.

रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक का आहे?जेव्हा आपण रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा यकृतातून बाहेर पडणारा पित्ताचा रस पचन प्रक्रियेत मदत करत नाही, ज्यामुळे उलट्या, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात. वास्तविक, रात्रभर तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात जे चहा पिताना पोटात जातात, जे चांगले बॅक्टेरियांना त्रास देतात, ज्यामुळे चयापचय परिणाम होतो आणि पोटात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.

आंबटपणारिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं आपली भूक संपते आणि तासन्तास खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे गॅस तयार होण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होतो.

व्रणसकाळी रिकाम्या पोटी कडक चहा प्यायल्याने पोटाच्या आतील पृष्ठभागालाही नुकसान होऊ शकते. असे दीर्घकाळ केले तर अल्सर आणि अ‍ॅसिडिटीची समस्या सुरू होते.

हाडे कमकुवत होणंरिकाम्या पोटी चहा प्यायची सवय लागल्यानं पुढे काही वर्षांनी शरीरातील सांधे दुखू लागतात. त्यामुळं पुढे हाडेही कमकुवत होत जातात.

डीहाइड्रेशनरात्रभर झोपून असल्यानं आपल्या शरीराला जास्त वेळ पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीरात डीहाइड्रेशन होऊ शकते. अशा परिस्थितीत शरीरात कॅफीन मिसळल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढते.

पुरुषांमध्ये प्रोस्टेट समस्यासकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेटशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

निद्रानाशजास्त चहाचे सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते आणि यामुळे चिडचिड आणि थकवा येण्याची समस्या सुरू होते.

चयापचयचहामुळे शरीरातील ऍसिड आणि अल्कधर्मी संतुलनास अडथळा येतो, ज्यामुळे नियमित चयापचय विस्कळीत होतं.

पोषणाचा अभावतुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला तर त्यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण नीट होत नाही.

दातांसाठी हानिकारकसकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास शरीरात आम्लपित्त तयार होते आणि दातांच्या संपर्कात आल्याने दातांचा इनॅमल खराब होतो. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना होण्याची समस्या देखील होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स