(Image Credit : independent.co.uk)
उन्हाळ्यात नेहमीच महिलांना यूटीआय(यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन)ची तक्रार इतर वातावरणाच्या तुलनेत अधिक होते. ज्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये खासकरुन हे इन्फेक्शन अधिक बघायला मिळतं. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. थोडं दुर्लक्ष तुमच्यासाठी महागात पडू शकतं.
वय वाढल्यावर अधिक धोका
महिलांमध्ये वय वाढण्यासोबत यूरिन इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. हे इन्फेक्शन गुप्तांगाच्या आजूबाजूच्या भागातही होऊ शकतं. जास्त ई-कोली बॅक्टेरियामुळे ही समस्या होते. महिलांमध्ये यूटीआयचं कारण बॅक्टेरियाचं यूरिनरी ब्लॅडरमध्ये प्रवेश करणं हे आहे. ज्यामुळे लघवी करताना महिलांच्या गुप्तांगामध्ये जळजळ किंवा वेदना होऊ शकते. उन्हाळ्यात महिलांना यूटीआयची समस्या अधिक होते, त्यामुळे ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होतं. नंतर लघवी करताना जळजळ आणि दर्गंधीही येऊ लागते.
(Image Credit : beranisehat.com)
कॅफीनचं सेवन घातक
जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने सुद्धा यूटीआय होण्याचा धोका असतो. चहा आणि कॉफीमध्ये असलेलं कॅफीन शरीरात शिरल्यावर तहान नष्ट करतं आणि यामुळे आपण पुरेसं पाणी सेवन करु शकत नाही. ज्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि तुम्ही सहजपणे यूटीआयचे शिकार होऊ शकता.
(Image Credit : Tempo)
जास्त कोल्ड ड्रिंक्सचं सेवन
उन्हाळ्यात अनेक लोक तहान लागल्यावर कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करतात, पण याचं सेवन करण्याआधी हे ध्यानात घ्या की, कोल्ड ड्रिंक्समध्ये कार्बोनेटेड आढळतं. ज्यामुळे लघवीत क्षार अधिक होतात आणि जळजळ कमी होते, पण याने डिहायड्रेशनची समस्या कमी होत नाही. याचं जास्त सेवन नुकसानकारक ठरु शकतं.
(Image Credit : Wide Open Eats)
घाणेरडे टॉयलेट
उन्हाळ्यात बॅक्टेरिया वेगाने पसरतो, त्यामुळे अस्वच्छ ठिकाणांवर ते अधिक असतात. त्यामुळे नेहमी स्वच्छ टॉयलेट, वॉशरुमचा वापर करा. स्वच्छता कोणत्याही रोगापासून बचाव करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.
फॉलो करा या टिप्स
- यूटीआयपासून बचावाचा साधा उपाय आहे जास्तीत जास्त पाणी पिणे.
- उन्हाळ्यात खासकरुन घट्ट कपडे परिधान करु नका.
- सार्वजिनिक वॉशरुमचा उपयोग न करणे चांगलं ठरेल.
- टॉयलेट-वॉशरुमचा वापर करण्याआधी पाण्याने स्वच्छ करुन घ्या.
- कोल्ड ड्रिंक्सचं सेवन कमी करा.