सध्या कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनाची लागण झाल्यास या आजारातून लवकर बाहरे येणं गरजेच आहे. त्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आपण आजारांपासून लढू शकतो.
त्यासाठी पोषक घटक मिळत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. पण तुम्हाला माहीत आहे. पाणी पिऊनसुद्धा तुम्ही तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला पाणी पिऊन रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवता येईल याबाबत सांगणार आहोत.
पाणी शरीरासाठी खूप आवश्यक असतं. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील तापमानसुद्धा कमी होते. आजारांचे कारण ठरत असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस शरीरातून बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते.
शरीरात पाणी पुरेसं असेल तर पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याासाठी फायदेशीर ठरतं. नेहमी हेल्दी आणि फिट राहण्यासाठी दिवसभरातून कमीककमी ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला सतत पाणी प्यायला आवडत नसेल तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पाण्याचे सेवन करू शकता. पाण्यात लिंबू किंवा पुदिन्याचा समावेश करून तुम्ही सेवन करू शकता.
लिंबू पाणी
लिंबात व्हिटाव्हीन सी पोटॅशियमचं प्रमाण मुबलक असतं. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लिंबाचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यासाठी तुम्ही आपल्या दिवसाच्या सुरूवातीला लिंबू घातलेल्या गरम पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे लठ्ठपणा, पोटाचे विकार कमी होण्यास फायदेशीर ठरेल.
पुदिन्याचं पाणी
पुदिन्याला औषधीयदृष्या खूप मह्त्व आहे. त्यात अनेक एटीं इंफ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सिडेंटल गुण असतात. त्यामुळे फ्रि रेडिक्लस एक्टिव्हीटी रोखण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी पुदिन्याचं पाणी फायदेशीर ठरतं.
या' थेरेपीने कोरोनाचे रुग्ण होणार १०० टक्के बरे होणार, पहिली चाचणी ठरली यशस्वी
जीवघेण्या एड्सच्या आजाराबाबत लोकांच्या मनात आहेत 'हे' ७ गैरसमज, जाणून घ्या सत्य