- मयूर पठाडेव्हिटॅमिन डीचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. यातली सुदैवाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश अतिशय भरपूर असल्यानं ड जीवनसत्त्वाची कमतरता आपल्याकडे जराही नाही. यातल्या विरोधाभासाची गोष्ट म्हणजे निसर्गत: ड जीवनसत्त्व आपल्याकडे भरपूर प्रमाणात असलं तरी त्याचाच आपण काहीच वापर करीत नाही. त्यामुळेच ड जीवनसत्त्वाच्या अभावी होणारे अनेक रोग आपल्याला त्रास देतात.शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार ड जीवनसत्त्वाच्या अभावी जे आजार होतात, त्यात मूत्रपिंडाच्या विकारांचाही समावेश केला आहे. सॅन दिएगो विद्यापीठात यासंदर्भाचा व्यापक अभ्यास करण्यात आला. ज्यांच्यात ड जीवनसत्त्वाची कमतरता आहे, त्यांच्यात मूत्रपिंडाच्या विकारांची शक्यता बºयाच मोठ्या प्रमाणात बळावते. हा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्त्रोत असला, तरी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमधूनही ड जीवनसत्त्व आपल्याला मिळू शकते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा लाभ घेतानाच या खाद्यपदार्थांचाही आपल्या आहारात समावेश केल्यास ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणाºया अनेक आजारांपासून आपल्याला आपला बचाव करता येईल.ड जीवनसत्त्व वाढवण्यासाठी काय खाल?माशांमधून चांगल्या प्रकारे ड जीवनसत्त्वं मिळू शकतात. याशिवाय दूधआणि दुग्धजन्य पदार्थ, आॅरेंज ज्यूस, सोया मिल्क, चिज, अंड्यातील पिवळा बलक.. यासारख्या खाद्य पदार्थात ड जीवनसत्त्वाची मात्रा चांगली असते. त्याचा वापर आपण करायला हवा.
ड जीवनसत्त्वाच्या अभावी वाढताहेत मूत्रपिंडाचे विकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 2:52 PM
व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी काय कराल?
ठळक मुद्देज्यांच्यात ड जीवनसत्त्वाची कमतरता आहे, त्यांच्यात मूत्रपिंडाच्या विकारांची शक्यता बºयाच मोठ्या प्रमाणात बळावते.शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा निष्कर्ष.दूधआणि दुग्धजन्य पदार्थ, आॅरेंज ज्यूस, सोया मिल्क, चिज, अंड्यातील पिवळा बलक.. यासारख्या खाद्यपदार्थात ड जीवनसत्त्वाची मात्रा चांगली असते.