40 वयानंतर केस पांढरे होणं सामान्य बाब आहे. जसजसं वय वाढतं, त्यांचे केस पांढरे होऊ लागतात. पण आजकाल बऱ्याच लोकांना कमी वयातच पांढरे केस होण्याची समस्या होते. अनेक केसेसमध्ये हे जेनेटिक कारण असतं. पण अनेकदा कारण शरीरातील पोषक तत्व कमी असणं असंही असतं.
जेव्हा केसांच्या रोम कोशिका पुरेशा मेलेनिनचं उत्पादन करत नाही. तेव्हा केस पांढरे होतात. यामागे अनेक कारणे असतात ज्यात तणाव, हार्मोनल चेंजेसही असतात किंवा विटिलिगो नावाची एक समस्या याचाही समावेश असतो. इथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होतात.
व्हिटॅमिन्सची कमतरता
केसांच्या विकासासोबत त्यांचा रंग कायम राहण्यासाठी पोषणाची गरज असते. जर आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर याने केस पांढरे होतात. अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिजांच्या कमीमुळे जसे की, व्हिटॅमिन बी 12, लोह, तांबे आणि झिंक शरीराला कमी मिळत असेल तर याने केस पांढरे होतात.
हार्मोन्समध्ये बदल
शरीरात हार्मोन्समध्ये बदल झाले तर खासकरून मोनोपॉज दरम्यान केसांचा रंग प्रभावित होतो. मेलानोसाइट-स्टिमुलेटिंग हार्मोन आणि कोर्टिसोलसारख्या हार्मोनमध्ये चढ-उतार झाल्याने ही समस्या वाढू शकते.
तणाव
जास्त काळ तणाव राहिल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोनची निर्मिती होऊ लागते. ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढते. जास्त काळ तणाव राहिल्याने जास्त मेलानोसाइट्सची कमतरता वाढते, ज्यामुळे केस पांढरे होतात.
धुम्रपान
धुम्रपानामुळे आारोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. यामुळे अनेक गंभीर समस्या होतात. याच्या सेवनाने शरीरात अनेक विषारी पदार्थ वाढतात. यानेच केस पांढरे होण्याची समस्या होते.