कोरोनाच्या माहामारीविरुद्ध जगभरात मोठं युद्ध सुरू आहे. कोरोनाच्या माहमारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संक्रमणाचा वेग कमी होण्यासाठी टेस्टिंग, सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर यांसारख्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली जात आहे. कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तर एकिकडे मृत्यूदरही वाढत आहे. संक्रमित झालेल्या महिलांच्या दूधात एंटीबॉडी मिळाल्यानंतर आता तज्ज्ञ बेस्ट मिल्कच्या साहाय्याने कोरोनाचे उपचार होऊ शकतात का, याबाबत अधिक संशोधन करत आहेत.
ब्रेस्ट मिल्कपासून असा होईल बचाव
डेलीमेलमध्ये प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोनापासून बचावासाठी आता आईच्या दूधाचा वापर केला जाणार आहे. कोरोनानं संक्रमित होऊन ठीक झालेल्या ३० महिलांच्या दूधात कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज दिसून आल्या आहेत. डच वैज्ञानिकांनी याबाबतचे संशोधन केलं आहे. प्लाज्मा थेरेपीप्रमाणे दूधाचा वापर करून कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार केल्या जाऊ शकतात. त्यातून मृत्यूच्या जाळ्यात अडकण्यापासून कोरोना रुग्णांचा बचाव केला जाऊ शकतो.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित आईच्या दूधाचे आईस क्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे रुग्णांना चघळण्यासाठी दिले गेले तर रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. डच ब्रेस्ट मिल्क बँकचे प्रमुख आणि या संशोधनाचे संशोधक व्रिट सॅम यांनी दिलेल्या माहितीनुसार आईस क्यूब चघळल्यानं रुग्णाच्या शरीरातील सगळ्या म्यूकस मेंमरेनमध्ये एंटीबॉडी पोहोचतील. शरीरातील श्वसनतंत्र आणि अन्य भागांना संसर्गापासून रोखण्यासाठी म्यूकस मेंमरेनची महत्वाची भूमिका अकते. म्हणूनच म्यूकस मेंमरेनमध्ये एंटीबॉडी प्रोटीन्स असतील तर कोरोना व्हायरसचे स्पाईक्स शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत.
संशोधन ब्रिट वॅन कुलेन यांनी दिलेल्या माहितीनसार घरी राहून कोरोना विषाणूंचे उपचार घेत असलेल्या वयस्कर लोकांना हे आईस क्यूब दिल्यास फायद्याचे ठरेल. कोरोना व्हायरसची जोखिम कमी होण्यास मदत होईल. तज्ज्ञांनी आवाहन केलं आहे की, पॉझिटिव्ह आणि निरोगी माता 100-100 C मिलीग्राम दूध दान करू शकतात. जेणेकरून अधिक संशोधन केलं जाऊ शकेल. दूध दान करण्यासाठी तब्बल पाच हजार महिला पुढे आल्या आहेत.
हे संशोधन नेदरलँडमधील एमा चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि अन्य रुग्णालयाच्या सहयोगानं करण्यात आलं होतं. या संशोधनाचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये पूर्ण झाला. संशोधक अजूनही याविषयावर संशोधन करत आहेत. जर हे संशोधन यशस्वी झालं तर कोरोनाशी लढण्यासाठी जगासमोर एक चांगला पर्याय समोरअसेल.
(टिप- जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कोरोनापासून बचावासाठी ब्रेस्ट मिल्क प्रभावी ठरत अस्याचा दावा डच तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.)
हे पण वाचा-
चिंताजनक! कोरोना लसीसाठी 'असा' शॉर्टकट वापरल्यास संपूर्ण जगाचा जीव धोक्यात येणार
Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण
सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या