शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रक्ताच्या कमतरतेमुळे दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्षं केलत तर होतील गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 11:55 AM

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये 58.6 टक्के मुलं, 53.2 टक्के मुली आणि 50.4 टक्के गर्भवती महिला रक्ताची कमतरता म्हणजेच, एनिमिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.

(फोटो : प्रातिनिधीक)

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये 58.6 टक्के मुलं, 53.2 टक्के मुली आणि 50.4 टक्के गर्भवती महिला रक्ताची कमतरता म्हणजेच, एनिमिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. एनिमिया एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रेड ब्लड सेल्स काउंट कमी होतो किंवा हिमोग्लोबिन लेव्हल कमी होतो. शरीरात रक्तामधून ऑक्सिजन सर्व अवयवांपर्यंत पोहोचवला जातो. पण शरीरातील हिमोग्लोबिन लेव्हल कमी झाल्यामुळे ऑक्सिजन शरीरात पोहचू शकत नाही. महिलांसाठी सामान्य हिमोग्लोबिन 12 ग्रॅम प्रति डेसीलीटर आणि पुरूषांमध्ये 13 ग्रॅम असतं. 

रक्ताच्या कमतरतेची दिसून येणारी लक्षणं 

शरीरामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवतो. तसेच हृदयाचे ठोक्यांमध्ये वाढ होणं, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, लक्ष न लागणं, चक्कर येणं, त्वचा पिवळी पडणं, पाय दुखणं, अल्सर, गॅस्ट्रिटिस, बद्धकोष्ट, विष्ठेतून रक्त येणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं दिसल्यावर त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करणं आवश्यक असतं. तरूण मुलींमध्ये रक्ताच्या कमतरतेची कारणं

तरूण मुलांच्या तुलनेमध्ये मुलींमध्ये एनिमियाचा धोका अधिक असतो. याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, महिलांना येणारी मासिक पाळी. याव्यतिरिक्त अनियमित जीवनशैली, आहार व्यवस्थित नसणं यांमुळेही रक्ताची कमतरता आढळून येते. सध्या अनेक मुली आयर्न असणारे पदार्थ जसं मांस, अंजी, कडधान्य यांसारख्या पदार्थांचं सेवन करत नाहीत. 

रक्ताच्या कमतरतपासून बचाव करण्यासाठी हे पदार्थ खा :

लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्हाला आपल्या डाएटमध्ये शरीरातील आयर्नची पातळी वाढविणारे पदार्थ खाण्याची आवश्यकता असते, ज्यामध्ये मांस, अंडी यांशिवाय ड्रायफ्रुट्स, मनुके, हिरव्या पालेभाज्या, धान्य, गहू, वाटाणे यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. 

1. टोमॅटो 

टोमॅटो खाल्याने शरीरामधील रक्ताच्या पातळीत वाढ होते. टोमॅटो खाल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने होते. तसेच त्वचेसाठीही टोमॅटोमधील पोषक तत्व फायदेशीर ठरतात. टोमॅटोचा सलाडमध्ये समावेश केल्याने फायदा होतो. परंतु, ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी टोमॅटोचं अधिक सेवन करणं टाळावं. 

2. मनुके 

मनुक्यांचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मनुके कोमट पाण्यात व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर दूधामध्ये उकळून घ्या. त्यानंतर हे दूध प्या आणि मनुके खा. असं दिवसातून दोन वेळा केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. थकवा दूर होण्यासोबतच शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यासही मदत होते. 

3. पालक 

शरीरामधील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी पालकचा समावेश आहारात करा. कारण शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. पालक आयर्नचा मुख्य स्त्रोत आहे. नियमितपणे आहारात याचा समावेश केल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यासोबतच मानसिक तणावही दूर होण्यास मदत होते. 

4. केळी 

केळ्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात. शरीरामध्ये शक्ती आणि चरबी दोन्ही वाढविण्यासाठी केळी मदत करतात. आहारात केळ्याचा समावेश केल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यासही मदत होते. 

5. अंजीर 

एका दिवसात एक कप अंजीर खाल्याने शरीराला जवळपास 240 मिलीग्रॅन कॅल्शिअम मिळतं. याव्यतिरिक्त यामध्ये फायबर, व्हिटॅमिन के आणि पोटॅशिअमही आढळून येतं. दररोज अनोशापोटी अंजीर खाल्याने बद्धकोष्ट आणि पचनासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. 

6. आवळा 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीफ्लेमेट्री तत्व आढळून येतात. ज्यामुळे शरीराचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतात. तसेच केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य वाढिवण्यासाठीही मदत होते. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Anemiaअ‍ॅनिमियाHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स