लिव्हरला शरीराचं पावर हाऊस म्हटलं जातं. कारण याने शरीराला सगळी एनर्जी मिळते. यानेच बॉडी डिटॉक्सिफिकेशन, मेटाबॉलिज्म आणि हॉर्मोन प्रॉडक्शनमध्ये महत्वाची भूमिका असते. पण फॅटी लिव्हर नावाचं सायलेंट किलर याचा सगळ्यात मोठा वैरी आहे.
फॅटी लिव्हर एक कॉमन आजार आहे. जे सिरोसिस आणि लिव्हर फेलिअरचं कारण बनू शकतं. यात लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट भरलं जातं आणि याचं कार्य कमी होऊ लागतं. जेव्हा हा आजार सुरू होतो. तेव्हा शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात.
फॅटी लिव्हरचं खूश करणारं लक्षण
फॅटी लिव्हरमुळे वजन वाढतं. याने सडपातळ लोक खूश होऊ शकतात. पण जर वजन तुमच्या पोटाच्या आजूबाजूला वाढत असेल तर फॅटी लिव्हरचं सायलेंट लक्षण असू शकतं. जे इन्सुलिन रेजिस्टेंस आणि मेटाबॉलिक डिस्फंक्शनसोबत जुळलं आहे.
मल-मूत्राचा रंग बदलणं
लिव्हर बिलिरूबिनचा वापर बाइल बनवण्यासाठी करतं. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतं तेव्हा ते लघवी किंवा विष्ठेच्या माध्यमातून बाहेर निघतं. ज्यामुळे लघवीचा रंग डार्क होतो आणि विष्ठेचा रंगही बदलतो.
डायबिटीसची असू शकते सुरूवात
जर तुम्हाला जास्त तहान लागत असेल किंवा जास्त लघवी किंवा धुसर दिसत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हा प्री डायबिटीज किंवा टाइप 2 डायबिटीस असू शकतो.
त्वचेवर फॅटी लिव्हरचे संकेत
त्वचेवरही फॅटी लिव्हरचे काही संकेत दिसतात. जेव्हा लिव्हरचं काम विस्कळीत होतं तेव्हा त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. त्वचेवर निळे डाग दिसू लागतात आणि खाजही येते.