Onion-Garlic Smell : अनेकदा बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खातात. दोन्हींची आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अनेकदा यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. ज्यामुळे चारचौघात तुम्ही मोकळेपणाने हसूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आम्ही काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
1) ग्रीन टी
जर कांदा किंवा लसूण खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी एक कप ग्रीन टी सेवन करा. याने तोंडाची दुर्गंधी दूर होईल. ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. याने अनेक फायदेही होतात. ग्रीन टी मुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच सोबतच याने हृदय निरोगी राहतं.
2) लिंबाचा रस
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे लिंबाचा रस. लसूण खाल्ल्यानंतर जर तुमच्या तोंडातून दुर्गधी येत असेल तर लगेच लिंबाचा रस सेवन करा. लिंबाच्या रसात सिट्रिक अॅसिड अशतं, ज्याने लसणाचा वास दूर होतो.
3) सफरचंद खा
जर तुम्ही लसूण किंवा कांदा खाल्ला असेल आणि याने तोंडातून दुर्गधी येत असेल हा सुद्धा एक सोपा उपाय आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंद खाऊ शकता. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सफरचंदमध्ये असलेल्या केमिकल्समुळे तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.
4) लवंग
स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते.पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते. लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.
5) आंबट फळे
संत्री, लिंबू या फळांमुळे तुमच्या लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते. लाळेतील अॅसीड घटकांमुळे तोंडातील मृतपेशी व अन्नघटक दूर होतात.
6) च्युइंगम
च्युइंगम खाल्ल्याने अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते. यासोबतच जिभ आणि दातही स्वच्छ होतात. तसेच यामुळे तोंडातील फूड पार्टिकल्स आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. अशात तुम्ही शुगर फ्रि च्युइंगम खायला हवं. जेवताना लसून आणि कांदा खाल्ल्यास तोंडाचा वास अधिक येतो. अशावेळी सोबत च्युइंगम ठेवावं.