High Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉलचं शरीरात काहीच काम नसतं. हे कोलेस्ट्रॉल नसांमध्ये चिकटून राहतं ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि याच कारणाने तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. अशात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे आणि त्यावरील उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे. सामान्यपणे जास्त फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतं.
ज्या पदार्थांमध्ये सॅच्युरेडेट आणि ट्रांस फॅट असतं. त्यांच्या सेवनाने घातक कोलेस्ट्रॉल वाढू लागतं. तूप, लोणी, मांस, चीज, डेयरी प्रॉडक्ट, आइसक्रीम, खोबऱ्याचं तेल इत्यादींमध्ये फॅट असतं. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतं.
हृदयाजवळ पोहोचू देऊ नका कोलेस्ट्रॉल
हाय कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये एक चिकट पदार्थ जमा होतो. जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा रक्तप्रवाह बंद होतो. योग्यप्रकारे रक्तप्रवाह होत नाही. अनेकदा हा पदार्थ तुटून हृदयाजवळ पोहोचतो आणि नसा बंद झाल्याने हार्ट अटॅकचं कारण ठरतो.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे?
फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. एनसीबीआयवर प्रकाशित रिसर्च सांगतो की, सॉल्यूबल फायबर आतड्यांमध्येच कोलेस्ट्रॉलला बांधतं आणि विष्ठेच्या माध्यमातून बाहेर काढतं. त्यामुळेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायबर असलेले पदार्थ खावेत.
सफरचंद
सफरचंदमध्ये पॉलिफेनोल्स, अॅटी ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करता येतं. याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील फॅट बरंच कमी होतं. याने हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास बरीच मदत मिळते.
गाजरही फायदेशीर
हिवाळ्यात मिळणाऱ्या गाजरांमध्ये डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे गाजराच्या सेवनाने नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉल दूर होतं.
मटर, ओट्स आणि ईसबगोलचं पावडर
मटर आणि ओट्ससोबत ईसबगोलच्या पावडरमध्येही सॉल्यूबल फायबर भरपूर असतं. मटर आणि ओट्सला शिजवलं जाऊ शकतं. त्याने कोलेस्ट्रॉल नसांमधून साफ होतं.