- मयूर पठाडेचॉकलेट! व्वा! नुसतं चॉकलेटचं नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं ना! त्यातही हे चॉकलेट जर डार्क चॉकलेट असेल तर मग विचारायलाच नको! पण याच चॉकलेटमुळे दात किडतात, आपलं आरोग्य बिघडतं यासारख्या गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील, पण तुम्ही जर खरोखरच चॉकलेटचे दिवाणे असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे! चॉकलेटमुळे तुमची स्मृती तल्लख होऊ शकते, पाहिलेलं, ऐकलेलं, वाचलेलं, अभ्यासाच्या गोष्टी तुमच्या चांगल्या लक्षात राहू शकतात! एवढंच नाही, तुमचं ज्ञान वाढण्यासाठीही या चॉकलेटचा, अर्थात ज्यापासून हे चॉकलेट बनवतात, त्या कोकोचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो!यासंदर्भात शास्त्रज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला. त्यातून काढलेला हा निष्कर्ष चॉकलेटप्रेमींसाठी फारच दिलासादायक ठरणार आहे. काय आहेत चॉकलेट खाण्याचे फायदे?१- चॉकलेटमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते.२- अर्थातच त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. अनेक गोष्टी लक्षात ठेवणं सोपं जातं.३- कोणत्याही गोष्टीवर, अभ्यासावर लक्ष एकाग्र करण्याची तुमची शक्ती, क्षमता वाढते.
४- व्हिज्युअल इन्फर्मेशन प्रोसेस करण्याची तुमची क्षमता तर वाढतेच, त्याशिवाय या प्रोसेसिंगचा तुमचा स्पीडही चांगलाच वाढतो.५- तुमची बोलण्याची, एखादा विषय उत्तम तऱ्हेने मांडण्याची तुमची शक्ती म्हणजेच तुमची व्हर्बल फ्लएन्सी चांगलीच वाढते.६- कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता वाढते. ७- शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, चॉकलेटचा महिलांना जास्त फायदा आहे.
८- बऱ्याचदा महिलांना रात्रीची व्यवस्थित झोप मिळत नाही. या महिला जर नवजात बाळाच्या आई असतील तर त्यांच्यासाठी झोप किती दुरापास्त झालेली असते आणि झोप त्यांना किती आवश्यक असते हे जरा एकदा त्यांनाच विचारून पाहा. पण कमी झोपेमुळे झालेले तोटे चॉकलेटमुळे भरून काढले जातात.९- या महिलांची झोप अपुरी झालेली असली तरीही चॉकलेट खाल्ल्यास ते नेहमीच्या पद्धतीनं नॉर्मल काम करू शकतात.१०- अपुऱ्या झोपेमुळे अनेकदा आकलनक्षमता कमी होते. काय चाललं आहे ते समजत नाही, लगेच लक्षात येत नाही, पण आकलनाची; ती जर तात्पुरती असेल, तर ही क्षमताही चॉकलेटच्या सेवनामुळे कमी होते.पाहिलंत, इतके सारे फायदे केवळ नियमिती चॉकलेट खाण्यामुळे होतात!चॉकलेटचे दुष्परिणाम!
चॉकलेटचे फायदे असले तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेतच. त्यामुळे त्याकडेही शास्त्रज्ञांनी सर्वसामान्यांचं लक्ष वेधलं आहे.चॉकलेटमुळे तुमच्या कॅलरीज वाढतात.अशा वाढलेल्या कॅलरीज तुमच्या शरीराला घातक असतात.शिवाय चॉकलेटमुळे दातांना किड लागते, ती वेगळीच.तर त्याकडेही लक्ष द्या!..