ब्रेस्ट कॅन्सरचं नाव ऐकताच अनेक महिलांना धडकी भरते. ब्रेस्ट कॅन्सर प्रामुख्याने महिलांमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. तसं पाहता हा आजार कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो. पण 40 वर्षांच्या महिलांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो. भारतात 22 टक्के महिलांचा मृत्यू हा ब्रेस्ट कॅन्सरमुळे होतो. इतर कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेने हा आकडा सर्वाधिक आहे. बदलती जीवनशैली आणि आहार यांमुळे ही समस्या उद्भवते. जर तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असाल तर यापासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात दह्याचा समावेश करणं आवश्यक आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक असतं. रोज एक वाटी दही खाल्याने पाचन क्रिया सुरळीत होते. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटीन आणि अन्य मिनरल्स आढळून येतात.
अप्लाइड अँड एन्वायरोनमेंट मायक्रोबॉयलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. जे ब्रेस्टमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढविण्याचं काम करतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. संशोधकांनुसार, लॅक्टोबेसिलस आणि स्टपटोकोकस यासारखे चांगले बॅक्टेरिया हेल्दी ब्रेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या बॅक्टेरियांमध्ये अॅन्टी-कॅन्सरची तत्व आढळून येतात.
या संशोधनादरम्यान, संशोधकांनी 58 महिलांच्या स्तनांच्या पेशींचा अभ्यास केला. या महिला वेगवेगळ्या ब्रेस्ट कॅन्सरनी पीडित होत्या. त्याचबरोबर यांमध्ये 23 निरोगी महिलांचाही समावेश होता. ज्यांनी ब्रेस्ट सर्जरी करून आपल्या ब्रेस्टचा आकार छोटा किंवा मोठा केला होता.