आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये फार जास्त बदल बघायला मिळत आहेत. रात्री उशीरापर्यंत जागणं, तासंतास लॅपटॉपवर काम करत बसणं आणि मग रात्री उशीरा जेवण करणं. या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे इच्छा असूनही अनेकांना हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता येत नाही. याचा परिणाम म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आधी लोक सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर किंवा वेळेवर झोपणे, ठेरलेल्या वेळेवर जेवण करणे हे नियम पाळत होते. त्यामुळे त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळत होतं. पण आजकाल लोक फार उशीरा जेवण करतात. याने त्यांना झोप येण्यासही अडचण होते आणि त्यांचं आरोग्यही बिघडतं. रात्री उशीरा जेवण करण्याचे दुष्परिणाम काय आहे हे खालीलप्रमाणे सांगता येतील....
निरोगी आणि फिट राहण्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी वेळेवर उठणे याबाबत आयुर्वेदातही लिहिलं गेलं आहे. जर तुम्हीही रात्री उशीरा जेवण करत असाल तर तुम्हाला खालील आजारांचा सामना करावा लागू शकतो.
वजन वाढतं - रात्री फार उशीरा जेवण केलं तर ते पचवण्यास फार अडचण निर्माण होते. याने कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यासोबतच जाडेपणा येण्याचही एक कारण रात्री उशीरा जेवण करणे हेच आहे.
तणाव - रात्री उशीरा जेवण केल्यावर अर्थातच झोप येण्यासही समस्या निर्माण होते. मग झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्हाला थकवा आणि तणाव जाणवू लागतो. तुम्हाला तणावमुक्त जीवन हवं असेल तर रात्री लवकर किंवा वेळेवर जेवण करा.
हाय ब्लड प्रेशर - जेवण केल्यावर लगेच झोपल्याने किंवा एकाच जागेवर बसल्याने शरीर जेवण पचवू शकत नाही. याने तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेवण केल्यावर थोडं चालणेही गरजेचे आहे.
डायबिटीज - जेवण केल्यावर अनेकांना काहीतरी गोड पदार्थ खाण्याची सवय असते. सतत असे केल्याने याने ब्लड शुगर स्तर वाढणं सुरु होतं. त्यातून वेगळ्याही काही समस्या वाढू शकतात.
अपचन - ज्या लोकांना नेहमीच अपचनाची समस्या असते त्यांनीही रात्री उशीरा जेवण करु नये. याने त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो.
चिडचिडपणा - जर तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नसाल, तर याचा थेट प्रभाव तुमच्या मानसिक आरोग्यावर पडतो. मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही, मग यामुळे तुमची चिडचिड होऊ लागते.