इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचे मराठी भाषांतर असे की, सकाळी राजासारखा नाश्ता करावा, एखाद्या राजकुमाराप्रमाणे दुपारचे भोजन करावे आणि रात्री एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे भोजन उरकावे. पण मित्रांनो रात्रीच्या जेवणाचे महत्व फार मोठं आहे. त्यातही रात्रीच्या वेळी वेळेवर जेवणं याचे पाच मुख्य फायदे तर जाणून घेतलेच पाहिजेत.
१. शांत झोप
वेळेत जेवण म्हणजे काय तर ७च्या आधी जेवणे. आता तुम्हाला वाटेल याने काय फरक पडतो. तर याने सर्वात जास्त फरक पडतो तो म्हणजे शांत झोप लागते. केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी रात्रीची पुरेशी झोप अति आवश्यक आहे. वेळेवर जेवण केल्याने ते पचतंही वेळेत त्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप शांत लागते.
२. वजन कमी होणेरात्री वेळेत जेवल्याने शरीरातील अन्न व्यवस्थित पचते. हे पचलेले अन्न विविध मार्गांनी तुमच्या शरिरातील इतर अवयवांना एनर्जी मिळते. तसेच यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढते. ज्याचा उपयोग वजन नियंत्रित ठेवण्यासाठी होतो.
३. पचनशक्ती वाढते
रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपल्यामुळे शरीराला अन्न पचन करायला वेळचं मिळतं नाही. त्यामुळे पोटाचे विकार, पचनासंबधीचे विकार होतात. हे टाळायचं असेल तर वेळेत जेवा.
४. मधुमेहाचा धोका कमी होतोमधुमेह नियंत्रित राखण्यासाठी रात्री वेळेत जेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्रीची जेवणाची वेळ पाळल्याने अन्न पचनप्रक्रियेत तयार होणारे अतिरिक्त ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेत जेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
५. हृदयाचे स्वास्थ्य सुधारतेआपल्या हृदयाच्या स्वास्थासाठी वेळेत जेवा. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यास पचनसंस्थेला पुरेसा वेळ मिळतो. तसेच शरीरासाठी अपायकारक फॅटी अॅसिड्सही तयार होत नाहीत. याच फॅटी अॅसिड्समुळे हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे हे सर्व नियंत्रित ठेवण्याचे कार्य रात्रीच्या वेळी वेळेत जेवल्याने होते.