How To Reduce High Cholesterol From Fruit : बॅड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फारच घातक आहे. जर वेळीच याला कंट्रोल केलं नाही तर ते नसांमध्ये जमा होऊन ब्लड फ्लो रोखतं आणि यामुळेच हाय बीपीची समस्या होते. नंतर कोरोनरी आर्टरी डिजीज, ट्रिपल वेसल डिजीज आणि हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या समस्या होतात. इतकंच नाही तर कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डायबिटीसचाही धोका वाढतो. अशात एक गुलाबी रंगाचं फळ खाऊन तुम्ही कोलेस्ट्रॉल दूर करू शकता.
हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ड्रॅगन फ्रूट
भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितलं की, जर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचं नियमित सेवन केलं तर रक्तात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते आणि शरीराला इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. चला जाणून घेऊ याचे फायदे...
1) डायबिटीसमध्ये फायदेशीर
ड्रॅगन फ्रूट ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतं जे डायबिटीसच्या रूग्णांसाठी चांगलं मानलं जातं. यात पॉलीफेनोल्स, थियोल, कॅरोटेनॉयड्स आणि ग्लूकोसाइनोलेट्स तत्व असतात. जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच यात हाय फायबरही असतं जे जेवणानंतर ग्लूकोजची लेव्हल वाढण्यास रोखतं.
2) हृदयासाठी फायदेशीर
ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहतं आणि धमण्यांची कठोरताही कमी होते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्याशिवाय या फळामध्ये मोनोअनटसॅचुरेटेड फॅटही असतं. जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी गरजेचं असतं.
3) कोलेस्ट्रॉल होईल कमी
ड्रॅगन फ्रूटमध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅट, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड भरपूर असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. यातील अॅंटी-ऑक्सीडेंट एलडीएल लेव्हल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळेच हे गुलाबी फळं नियमित खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
ड्रॅगन फ्रूटमधील फायदेशीर तत्व
तुम्ही कधीना कधी ड्रॅगन फ्रूट खाल्लं असेलच. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबत ते दिसायलाही आकर्षक वाटतं. या फळांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स भरपूर असतात. या गुलाबी फळांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, कॅरोटीन, प्रोटीन, थायमिन आणि पॉलीअनसेचुरेटेड फॅटी अॅसिडही असतं. या फळांमध्ये एक रिच न्यूट्रिशनल प्रोफाइल आहे ज्यांचा तुम्ही विचार करायला हवा आणि याचा नियमित आहारात समावेश करायला हवा.