शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

आंबवलेले पदार्थ खा आणि व्हा गोडाच्या व्यसनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:33 PM

आठवड्याच्या आत साखरेची चटक होऊ शकते कमी

ठळक मुद्देआंबवलेले पदार्थ जर योग्य प्रमाणात आपल्या खाण्यात असले, तर साखर खाण्याची आपली इच्छा आपोआपच कमी होते.टेन्शनमुळे गोड खाण्याची इच्छा आपोआप वाढते. त्यामुळे आपल्या टेन्शनवरील उपाय आपल्यालाच शोधायला हवा.‘इएफटी’ म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स’ वापरुन आपण साखरेच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतो.

- मयूर पठाडेआपल्याकडे मधुमेह्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की जागतिक आरोग्य संघटनेनंही त्याबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. अशाच पद्धतीनं भारतात मधुमेह्यांची संख्या वाढली तर संपूर्ण देशापुढेच इतर कोणतही प्रश्नापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न ठरेल, असा इशराही तज्ञांनी वेळोवेळी दिला आहे.मात्र मधुमेह्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही कोणीच त्याबाबत फारसं गंभीर नाही. सरकार तर नाहीच, पण ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, असे रुग्णदेखील त्याकडे दुर्लक्षच करतात. ‘किरकोळ’ म्हणून सोडून देतात आणि आपली आहे तिच जिवनशैली कायम ठेवतात.साखरेचं तर आपल्याला कधीच वावडं नव्हतं आणि मधुमेही लोकही ‘एखादवेळी खाल्लं तर काय होतं’ म्हणून त्याकडे अगदीच लाईटली पाहातात. अर्थात त्यामागे गोड खाण्यासाठी, चहा पिण्यासाठीचा आग्रहही कारणीभूत असतो.पण जास्त गोड पदार्थ आणि साखर कमी करण्याचा प्रयत्न मनापासून केलाच पाहिजे.त्यासाठी काही सोपे उपायदेखील करून पाहाता येतील.साखरेपासून दूर राहायचं असेल तर त्यासाठीचा एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे आंबवलेले पदार्थ जर योग्य प्रमाणात आपल्या खाण्यात असले, तर साखर खाण्याची आपली इच्छा आपोआपच कमी होते. मात्र शक्यतो हे आंबवलेले पदार्थ घरीच तयार केलेले असले तर उत्तम. कारण त्यातील घटकांवर आपलं नियंत्रण राहातं.अभ्यासक सांगतात, अगदी कमीत कमी काळात, म्हणजे अगदी आठवड्याच्या आत तुमची साखरेची चटक यामुळे कमी होऊ शकते.आपल्याला जर रोजची टेन्शन्स, मोठ्या प्रमाणातील जबाबदाºया आणि त्या वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान.. यासारख्या गोष्टी जर दररोजच तुम्हाला कराव्या लागत असतील, तर टेन्शनमुळेही गोड खाण्याची इच्छा आपोआप वाढते.आपली टेन्शन्स आपल्यालाच कमी करता येतात. प्रत्येक गोष्टीच्या मागे स्वत:च धावत बसण्यापेक्षा काही गोष्टी इतरांवर सोपवता येतात का याचाही विचार करा. रोजच्या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढा.ध्यानधारणा, व्यायाम या गोष्टीही आपल्याला यासाठी उपयुक्त ठरू शकतील.‘इएफटी’ हा आणखी एक उत्तम उपाय आहे. ‘इएफटी’ म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स’. इमोशनल अ‍ॅक्युप्रेशर पॉर्इंट्सच्या साहाय्यानं आपण साखरेच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतो. त्याचाही वापर करून पाहायला हरकत नाही.