शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​हिवाळ्यात हे खा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2016 3:34 PM

हिवाळ्याला सुरूवात होताच आपण थंडीपासून बचावासाठी स्वेटर, गरम कपडे, शॉल आदी साहित्यांचा वापर करतो. यामुळे शरीराच्या बाह्य अवयवांचे तर संरक्षण होते, मात्र शरीराच्या आतील भागांना ऊर्जा मिळण्यासाठी विचार करायला हवा.

-Ravindra Moreहिवाळ्याला सुरूवात होताच आपण थंडीपासून बचावासाठी स्वेटर, गरम कपडे, शॉल आदी साहित्यांचा वापर करतो. यामुळे शरीराच्या बाह्य अवयवांचे तर संरक्षण होते, मात्र शरीराच्या आतील भागांना ऊर्जा मिळण्यासाठी विचार करायला हवा. बऱ्याचजणांना हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा जास्त त्रास होतो.  मग या त्रासापासून वाचण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश असावा याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...संत्रीरसदार संत्र्यात पोषक घटक भरपूर आहेत. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम भरपूर असते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, सल्फर आणि क्लोरिन असते. संत्र्यावरच्या आवरणात सर्वांत जास्त कॅल्शियम असते. म्हणूनच संत्र्याचे सेवन सालासकट करायला पाहिजे. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेट व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते आणि विकारांना दूर करते, तसेच थंडीशी लढायला ऊर्जादेखील मिळते. पालकया ऋतूत पालक सहज मिळतो, यामुळे याचे सेवन करणे टाळू नका. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठीचे घटक म्हणजेच लोह आणि पौष्टिक तत्त्वे यात भरपूर प्रमाणात आहेत. शेंगदाणेशरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक घटक जसे न्यूट्रियन्टस, मिनरल, अ‍ॅण्टी-आॅक्सिडेंट आदी घटक शेंगदाण्यामध्ये आढळतात. थंडीत शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळून शरीर गरम राहते.  शिवाय प्रोटिन्सदेखील मिळतात. थंडीतील खोकल्यावर शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर असून, फुफ्फुसाला बळ मिळते. थंडीत तळलेले, मीठ लावलेले किंवा साधे शेंगदाणे भरपूर खा. बाजारात मिळणारी चिक्की या दिवसात नेहमी सोबतच ठेवावी. पेरुथंडीत ह्रदयाची शक्ती वाढविण्यासाठी पेरुचे सेवन अत्यावश्यक आहे.  यास ‘जाम’ किंवा ’अमरूद’ असेही म्हटले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर ‘क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या ‘व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यत: मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. कारण त्यातील ‘क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.गाजर गाजरामध्ये विटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि के भरपूर प्रमाणात असल्याने ते थंडीपासून लढण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात.किवीया फळात विटॅमिन ‘सी’चे प्रमाण भरपूर आहे, जे थंडीत खूप फायदेशीर आहे. शिवाय यातील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील घातक जिवाणूदेखील नष्ट होतात. कॉफीकॉफीतील फ्लेवनॉइड घटकामुळे ह्रदयाचे कार्य चांगले चालते आणि त्यामुळे सर्दीचा त्रास होत नाही, शिवाय शरीराला गरमीदेखील मिळते. सुकामेवा सुकामेव्यातील पोषक तत्त्वांमुळे शरीराला आतून ऊर्जा मिळते त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. यासाठी आपल्या सोबत विविध प्रकारच्या सुकामेवांचे मिश्रण बनवून ठेवा आणि त्याला दिवसातून काही तासांच्या फरकाने खावे. सफरचंदहिवाळ्यात सफरचंद भरपूर उपलब्ध असतात. विशेष म्हणजे सफरचंदामधील तत्त्वांमुळे कॅन्सर तसेच अन्य कित्येक आजारांपासून मुक्ती मिळते. सफरचंदातील अ‍ॅन्टी-आॅक्सिडेंट आणि प्रोटिन्समुळे शरीराला मजबूती मिळते.