(Image Credit : guardian.ng)
एका निरोगी व्यक्तीच्या लिव्हरचं(यकृत) वजन जवळपास एक ते दीड किलोग्रॅम असतं. लिव्हर हे शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अंगांपैकी एक आहे. लिव्हरच्या मदतीने शरीरातील पचनक्रिया, मेटाबॉलिज्म, इम्यूनिटी आणि पोषक पदार्थांचं स्टोरेज यात महत्त्वाची भूमिका असते. तसेच लिव्हर आपल्या शरीरातील रक्त प्रक्रिया नियंत्रित करते, त्यातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
लिव्हरची कार्ये
शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते. तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे. आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे. निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिन ची निर्मीती करणे. तसेच पित्त रस तयार करून त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.
लिव्हर निरोगी नसल्यास काय होतात समस्या?
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेली लाइफस्टाईल यामुळे लिव्हरवर बदाव वाढतो, यामुळे विषारी पदार्थ आणि फॅटची योग्यप्रकारे प्रक्रिया होत नाही. याकारणाने शरीरात जाडेपणा, हृदय रोग, थकवा, डोकेदुखी, पचनक्रिया बिघडणे, अॅलर्जी आणि इतरही समस्या होतात. अशावेळी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.
निरोगी लिव्हरसाठी लसूण
लिव्हर साफ करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. याने लिव्हरमधील एंजाइम्सला अॅक्टिव्हेट करण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच यात एलिसिन आणि सेलेनियम नावाचे दोन नैसर्गिक कपांऊड आढळतात, जे लिव्हर-क्लीनिंग प्रोसेस आणखी चांगली करतात. त्यासोबतच लसूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड लेव्हल्सला कमी करतो.
लिव्हर डिटॉक्स करतं पपनस
पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे.रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात. पपनसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पेक्टिन आणि अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे लिव्हर क्लीनिंग प्रोसेसमध्ये मदत करतात. सोबतच यात ग्लूटेथिओन नावाचं प्रभावी अॅंटीऑकिडेंट आढळतं जे फ्री रेडिकल्स निकामी करतं आणि लिव्हरला डिटॉक्सीफाय करतं.
रक्त शुद्ध करण्यासाठी बीट
बीट हे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि याच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. यात भरपूर प्रमाणात प्लांट फ्लावनॉयड्स आणि बीटा-कॅरोटीन आढळतात जे लिव्हरची क्रिया ठिक करतं. सोबतच बीट हे रक्त शुद्ध करण्यासाठीही फायदशीर फळ आहे. त्यामुळे रोज जेवण करताना या आहारात समावेश करावा.
लिंबाचाही होतो फायदा
लिंबू पाणीही लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं. कारण यात डी-लायमोनीन अॅटीऑक्सिडेंट अशतं. तसंच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे लिव्हरला पचनक्रिया वाढवणारे एंजाइम्स तयार करण्यास मदत करतं.