थायरॉईडची समस्या एक गंभीर समस्या आहे. देशात मोठ्या वेगाने हा आजार पसरतो आहे. जवळपास 42 मिलियन लोकांना हायपोथायरॉईड, हायपरथायरॉईड, थायरॉईड कॅन्सर सारखे वेगवेगळ्या प्रकारच्या थायरॉयडने अनेकजण ग्रस्त आहेत. भारतात प्रत्येक 10 लोकांपैकी एकाला हायपोथायरॉईडिज्मने ग्रस्त आहे. महिलांमध्येही समस्या पुरुषांपेक्षा तीन पटीने अधिक आहे. न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांच्यानुसार, चांगलं खाणं-पिणं केल्यास या आजारापासून सुटका मिळवली जाऊ शकते. काही गोष्टींचा डाएटमध्ये समावेश केल्यास थायरॉईडपासून तुम्हाला आराम मिळेल.
काय आहे थायरॉईड?
थायरॉईड हा रोग नसून एका ग्रंथीचं नाव आहे. ज्यामुळे हा आजार होतो. पण सर्वसामान्य लोक या आजाराला थायरॉईड असंच म्हणतात. थायरॉईड या ग्रंथीचं काम थायरॉक्सिन हार्मोन तयार करुन रक्तात पोहोचवणे आहे. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म नियंत्रित राहतात. या ग्रंथी दोन प्रकारचे हार्मोन्स तयार करतात. एक म्हणजे टी-3 ज्याला ट्राय-आयोडो-थायरोनिन म्हणतात. तर दुसऱ्याला टी-4 म्हणजेच थायरॉक्सिन असे म्हणतात. जेव्हा या दोन्ही हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा थायरॉईडची समस्या वाढते.
थायरॉईडची लक्षणे
- या आजारामुळे इम्युनिटी सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते.- खूप जास्त थकवा जाणवणे- शरीर सुस्त होणे- थोडं काम केल्यावरही एनर्जी संपणे- डिप्रेशन - कोणत्याही कामात मन न लागणे- स्मरणशक्ती कमी होणे- मांसपेशीमध्ये वेदना होणे
थायरॉईडपासून आराम मिळवण्यासाठी काय खावे?
- प्रत्येक 3 किंवा 4 तासांनी काहीतरी खावे- डाएटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जसे की, ओट्स, ज्वारी यांचा समावेश कराय- आहारात आयोडिन मिठ आणि मासे खावे. - आर्यनची कमतरता भरुन काढण्यासाठी हिरव्या भाज्या, किशमिश, डाळ यांचा समावेश करा.- सेलेनियम असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करा. - डाएटमध्ये अंडे, चिकन, पालक यांचा समावेश करा- चहा आणि कॉफी सारखे कॅफीन असलेले पेय पिऊ नका.