वाढतं वजन किंवा जाडेपणा ही अलिकडे एक गंभीर समस्या बनली आहे. वजन वाढल्याने दुसऱ्या आणखीही गंभीर समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या दूर करायची असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करावा लागेल. तुम्हाला रोज एकाच वेळेवर नाश्ता आणि जेवण करावं लागेल.
तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत थोडा बदल केला तर तुम्ही जाडेपणासहीत आणखीही आजारांपासून बचाव करु शकता. ब्रिटनमधील एका विश्वविद्यालयात १० आठवडे केल्या गेलेल्या संशोधनादरम्यान काही लोकांचे दोन गट करण्यात आले होते आणि त्यांना सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत ९० मिनिटांचा बदल करण्यास सांगण्यात आलं होतं.
अभ्यासकांना या संशोधनात हे आढळून आलं की, वेळेवर जेवण केल्यास डायबिटीज, हृदय रोग, रक्तासंबंधी समस्या आणि शरीराच्या संरचनेत सकारात्मक बदल झाले. जर्नल ऑफ न्यूट्रीशन सायन्समध्ये प्रकाशित या संशोधनात असेल दिसले की, ज्यांनी वेळेवर जेवण केलं ते इतरांच्या तुलनेत दुप्पट वजन कमी करु शकले.
वेळेवर न जेवण्याचे नुकसान
आयुर्वेदामध्ये जेवणासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अनेकजण जेव्हा भूक लागते तेव्हाच जेवण करतात. पण या सवयीमुळे आरोग्याला नुकसान होऊ शकतं. जेवण जर योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलं तरच त्याचा फायदा होतो. जेवण जर रात्री उशीरा केलं तर ते पचण्याची समस्या होऊ शकते. अशाचप्रकारे काही पदार्थ एकत्र खाल्यानेही आरोग्याला धोका होऊ शकतो. कधी कधी हेल्दी पदार्थही चुकीच्या वेळेवर खाल्ले तर त्याचं विष पोटात तयार होतं.