शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
2
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
3
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
4
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
5
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
6
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
7
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
8
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
9
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
10
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
11
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
12
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
13
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
14
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
15
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
16
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
17
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
18
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
19
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

खा दही नियमित; फायदे आहेत अगणित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 7:24 PM

दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्याशी निगडित समस्यांवर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. पण बरेचदा अनेकांना हा प्रश्न पडतो की दही खाण्याची नेमकी योग्य वेळ कोणती?

दुधापासून तयार होणारा एक पौष्टीक पदार्थ म्हणजे दही. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी ६ आणि व्हिटामिन बी१२ इत्यादी पोषक घटक असतात. हे पोषक घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्याशी निगडित समस्यांवर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे.पण बरेचदा अनेकांना हा प्रश्न पडतो की दही खाण्याची नेमकी योग्य वेळ कोणती? आमच्याकडे त्याचे उत्तर आहे. पाहुयात...

कधी खावे दही?दही हे शक्यतो आपण दुपारच्या वेळी खाल्ले पाहिजे. दररोज दुपारी एक वाटी दही खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे दुपारी दररोज दही खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते. यासाठी आपण दररोज दही खाल्ले पाहिजे. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.

दही खाताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेतएक म्हणजे दह्यात फॅटचे प्रमाण अधिक असते. तसेच दही दुधापासून तयार होत असल्याने दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो.रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार होते. आपले सौंदर्य अधिक उजळवण्यासाठी दही खावे. आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न