सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत रात्रीचं उरलेलं दुपारी किंवा दुपारचं उरलेलं रात्री खाण्याची अनेकांना सवय असते. काही पदार्थ शिळे खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. कारण त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन टाळायला हवं याबाबत अधिक माहिती देणार आहोत. नेहमी निरोगी आणि फिट राहण्यासाठी काही पदार्थांचे सेवन टाळणं शरीरासाठी उत्तम ठरतं.
बटाटा
शिळ्या बटाट्याचे सेवन कधीही करू नये. कारण बटाटा शिजवल्यानंतर दीर्घकाळ तसाच ठेवल्यास त्यात क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे बोटुलिज्म आजाराचा सामना करावा लागू शकतो. या आजाराची लागण झाल्यास डोळ्यांना कमी दिसणं, श्वास घ्यायला त्रास होणं या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
पालक
पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, परंतु पालक जेव्हा ते शिळं असते तेव्हा ते खाऊ नये. शिळे पालक घेतल्यामुळे आपल्याला बर्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पालक जास्त प्रमाणात शिजवूनही खाऊ नये.
भात
शिळे भात खाल्ल्यानेही अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो. तांदूळ जर शिळा असेल तर त्याचे सेवन करु नका. शिळा भात खाल्ल्याने तुम्हाला पचनाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
तेलकट अन्नपदार्थ
तेलकट पदार्थ गरम केल्यावर हानिकारक रसायने तयार होतात जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर आपण शिळे तेलकट पदार्थ खात असाल तर ते जास्त गरम करू नका. निरोगी राहण्यासाठी शिळा असताना तेलकट पदार्थ खाऊ नका.
भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार
फळं
डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सॅलेड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
या वातावरणात फूड पॉयजनिंगची प्रकरणे अधिक बघायला मिळतात. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात.
तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
दुधाचे पदार्थ
काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा.
शिळ्याचे परिणाम
शरीराची चयापचय क्रिया बिघडली की शरीरात नको इतक्या प्रमाणात मेद, चरबी साठू लागते. स्थूलता वाढीस लागते! चरबीचं नीट पचन न झाल्यानं कमी आहार घेतला तरी वजन वाढतच राहातं. रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. पुढे शिळं अन्न खाण्याची सवय तशीच राहिल्यास रक्तवाहिन्या संकुचित होतात. त्यात ब्लॉक्स तयार होऊन हृदयविकार होण्याची शक्यता बळावते.
ब-याच रुग्णांमध्ये याबरोबरच वाताची विकृती झाल्यास सांधे सुजणं, दुखणं, गरम लाल होणं, सांधे आखडून हालचाल अशक्य होणं इतका त्नास उद्भवू शकतो!
रोजच्या बघण्यात असे अनेक रुग्ण असतात की ज्यांना थोडं जरी शिळं अन्न खाल्लं तरी जळजळ होते, मळमळ होते, उलट्या होतात, पित्त वाढून प्रचंड डोकं दुखतं. थोडा पोळीचा कुस्करा, शिळी खिचडी काहीही खाल्लं तरी कामाचा पूर्ण दिवस वाया जातो. ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती आहे त्यांना शिळ्या अन्नाचे परिणाम ताबडतोब जाणवतात कारण त्यांचा अग्नी अतिशय संवेदनशील असतो.