ऑफिसमध्ये कामाचा स्ट्रेस आणि वेळ वाचवण्यासाठी बऱ्याचदा आपण आपल्या डेस्कवरच दुपारचं जेवण जेवतो. यामागे हाच उद्देश असतो की, वेळ वाचेल आणि बसल्याजागीच जेवून लगेच काम सुरू करणे शक्य होईल. परंतु असे करणं आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. त्यामुळे आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात ऑफिसच्या डेस्कवरच जेवल्याने शरीराला कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते.
सांधेदुखी
एकाच जागेवर बसून राहिल्याने सांधे आणि स्नायूंना सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त वेळ एकाच जागी बसून नये. थोड्या थोड्या वेळाने डेस्कवरून उठणे गरजेचे असते. लंच ब्रेक हा जागेवरून उठण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
मानसिक ब्रेक
स्ट्रेस रिलिज करण्यासाठी शरीराला कामातून थोडं बाहेर पडणं गरजेचं असतं. कारण ब्रेकच्यावेळी आपण कामाबद्दल विचार करत नाही. त्यामुळे लंच ब्रेकमध्ये तुम्ही रिलिफ होऊन पुन्हा काम करण्यासाठी तयार होता.
कामाचा ताण कमी होतो
डेस्कवरच बसून जेवल्यानं तुमचं सगळं लक्ष कामावर आणि ईमेलला उत्तर देणं इत्यादी गोष्टींकडेच असतं. त्यामुळे लंच ब्रेकमध्ये बाहेर जाण्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. थोडं फ्रेश वाटतं. जर तुम्ही डेस्कवर बसूनचं जेवत असाल तर तुम्हाला भविष्यात हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल तसेच डायबेटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
बॅक्टेरिअल इन्फेक्शन
तुम्ही दिवसभर डेस्कवर बसून काम करता. दिवसभरात तुमच्या डेस्कवर आणि कम्प्यूटरच्या किबोर्डवर अनेक जर्म्स आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळे काम करता करताच जर तुम्ही जेवलात तर तुमच्या हातांमार्फत हे सगळे बॅक्टेरिया तुमच्या पोटात जातील.
घाईत जेवल्याने नुकसान
डेस्कवर बसून जेवताना आपण घाईत जेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या शरीराला नुकसान पोहोचते. आपण जेवताना सावकाश जेवणे गरजेचे असते. डेस्कवरच जेवल्यामुळे आपले सर्व लक्ष हे कामात असते त्या गडबडीमध्ये आपण घाईत जेवून घेतो. तयामुळे पचनक्रियेसंदर्भातील समस्यांना सामोरे जावे लागते.