Pakoda With Tea Healthy or Not: पावसाला सुरूवात झाली की, जास्तीत जास्त लोक सगळ्यात आधी गरमागरम भजी आणि चहाचा आनंद घेण्याच्या प्रयत्नात असतात. बरेच लोक चहा आणि भजी सोबत खातात. सोशल मीडियावर याचे फोटोही शेअर करतात. अनेकांना वाटतं की, चहा आणि भजी एक हेल्दी कॉम्बिनेशन आहे. पण हा समज चुकीचा आहे. खरंच चहा आणि भजी यांचं एकत्र सेवन केलं पाहिजे का? हे हेल्दी असतं की, घातक? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
एक्सपर्ट चहा आणि भजी यांचं कॉम्बिशेन हेल्दी मानत नाहीत. चहासोबत तळलेले पदार्थ खाणं योग्य नाही. अनेक शोधांमधूनही असा दावा करण्यात आला आहे की, चहासोबत भजी खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
पावसाळ्यात चहा आणि भजी खाणं फारच कॉमन आहे. पण हे कॉम्बिनेशन नुकसानकारक ठरू शकतं. भजी तेलात तळलेली असतात आणि यात तेलाचं प्रमाणही जास्त असतं. चहासोबत भजी खाल्ल्याने पचन तंत्र बिघडू शकतं. पावसाळ्यात आधीच मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया स्लो होते. ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. बेसनापासून तयार भजीमुळे पचनासंबंधी समस्या होऊ शकते. असंही म्हटलं जातं की, चहासोबत भजी खाल्ल्याने शरीरात न्यूट्रिशन अवशोषण स्लो होतं.
एक्सपर्ट्सनुसार, तळलेल्या पदार्थांचं जास्त सेवन करणं कोणत्याही ऋतूमध्ये चांगलं नसतं. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाऊन आरोग्यासंबंधी समस्या वाढतात. केवळ भजीच नाही तर चहासोबत बिस्कीट आणि जंक फूड खाणंही टाळलं पाहिजे. याने शरीराला पोषक तत्व कमी मिळतात. आजारांचा धोका वाढतो. जास्त चहा आणि बिस्कीट खाल्ल्याने इन्सुलिन रेजिस्टेंस, बीपी, लठ्ठपणा, अॅसिडिटी आणि पचनासंबंधी इतर समस्या होतात. खासकरून पावसाळ्यात खाण्या-पिण्याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे.