आपण जेवण शिल्लक राहिले, तर ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खातो. कारण आपल्याला नेहमी वाटते की, कोणताही खाद्यपदार्थ फेकून देऊ नये. पण, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पुन्हा गरम करुन खाणे देखील धकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यांना नुकसान होऊ शकते. जेणेकरून आपण पुढील अडचणी देखील टाळू शकातो. चला तर मग जाणून घेऊयात की, कोणत्या गोष्टीं पुन्हा गरम करुन खाणे टाळले पाहिजे.
पालक आणि हिरव्या भाज्याजर कधी पालक किंवा कोणत्याही हिरव्या भाज्या शिळ्या असतील, तर त्या पुन्हा गरम करू नयेत. कारण, पालक या भाजीमध्ये भरपूर लोह असते आणि जेव्हा तुम्ही ते पुन्हा गरम करता तेव्हा ते ऑक्सिडाइझ होते. लोहाच्या ऑक्सिडेशनमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
भातन शिजवलेल्या तांदळामध्ये काही जिवाणू आढळतात आणि तुम्ही तांदूळ शिजवता तेव्हा देखील ते त्यात असतात. परंतु ते आपल्या शरीराला हानिकारक नाहीत. पण, तांदूळ शिजवल्यानंतर, जेव्हा तो खोलीच्या तपमानावर बराच काळ ठेवला जातो, तेव्हा हे जीवाणू बॅक्टीरियामध्ये बदलतात. यानंतर, जेव्हा हे बॅक्टीरिया तुमच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा तुम्हाला अन्नाची विषबाधा म्हणजे फूड पॉइजनिंग होऊ शकते.
मशरूममशरूम शिजवल्यानंतर लगेच खाल्ले पाहिजेत. मशरूमला दुसऱ्या दिवसासाठी कधीही ठेवू नये, कारण त्यात असे अनेक घटक असतात, जे नंतर तुमच्या पाचन तंत्रासाठी हानिकारक ठरु शकतात. जर मशरूम शिल्लक असतील तर ते थंड खा पण गरम करू नका.
शिळं अन्न खाण्याचे दुष्परिणाम
- बॅक्टेरियांची वाढ होते - शिजवलेलं अन्न आपण थेट फ्रीज मध्ये ठेवत नाही. ते थोडं थंड करूनच फ्रीजमध्ये ठेवले जाते. पण यादरम्यान अन्नामध्ये अनेक मायक्रोऑर्गॅनिझम्सची वाढ होते. यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता दाट असते.
- अन्नविषबाधेची शक्यता - अन्नात अतिप्रमाणात बॅक्टेरियांची वाढ झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवल्यास ते आतमधील इतर पदार्थांनादेखील खराब करू शकते. त्यामुळे दुषित अन्न खाण्याची शक्यता वाढते. परिणामी नकळत तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आरोग्यदेखील धोक्यात येते.
- पोषणद्रव्यांची कमतरता - अनेक पदार्थ गॅसच्या मोठ्या आचेवर शिजवले जातात. त्यामुळे पदार्थामधील अनेक पोषकघटक नष्ट होतात. त्यातही ते फ्रीजमध्ये साठवल्यास उरलेले पोषक घटकही कमी होतात. असे शिळे अन्न खाणे शरीराला कोणतीच आरोग्यदायी मदत करत नाही. त्यामुळे ताजे अन्न बनवून नियमित खाण्याची सवय ठेवा.