Avoid These Food Combinations With Curd: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक दही खातात. कारण याने शरीर थंड राहतं. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की, पावसाळ्यात दही खावं की नाही? इतकंच नाही तर या दिवसात दह्यासोबत काय खावं किंवा खाऊ नये असाही प्रश्न अनेकांना पडतो. मुळात पावसाळ्यात पचन तंत्र कमजोर होत असतं. अशात जे काही आपण खातो तेव्हा खूप काळजी घेतली पाहिजे. तेच दह्याबाबत आहे. या दिवसात दह्यासोबत काय खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दही हे आरोग्यासाठी चांगलं असतं हे सगळ्यांना माहीत आहे. गुड बॅक्टेरिया असतात जे पोटाचं आरोग्य चांगलं ठेवतात.
दह्यासोबत काय खाऊ नये?
- बरेच दह्यासोबत आंब्याचं सेवन करतात. पण असं अजिबात करू नये. एका रिपोर्टनुसार, आंबे उष्ण असतात आणि दही थंड असतं. आयुर्वेदानुसार, दोन्हीही विरूद्ध आहार आहेत. यामुळे डायजेशनमध्ये समस्या होते. याचा प्रभाव त्वचेवरही पडतो. तसेच या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ वाढतात.
- दुधासोबत दही खाल्ल्यानेही समस्या होऊ शकते. यामुळे हार्ट बर्न आणि पोटात ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. तसेच शरीरात हाय फॅट आणि हाय प्रोटीनमुळेही आरोग्य बिघडतं.
- बटर लावलेल्या पराठ्यासोबत दही खाल्लं तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. कोणत्याही तेलकट पदार्थासोबत दही खाणं घातक ठरू शकतं. जर तुम्ही आलू पराठे, छोले-भटूऱ्यांसोबत दही खाल तुम्हाला दिवसा आळस जाणवेल.
- मास्यांसोबत दही कधीच खाऊ नये. दोन्ही गोष्टींमध्ये प्रोटीन फार जास्त असतं. अशात आयुर्वेद हे सांगतं की, दही आणि मासे सोबत खाल्ल्याने नुकसान होतं. यामुळे तुम्हाला एलर्जी होऊ शकते.
- बरेच लोक कोशिंबीर बनवताना दही आणि कांदा एकत्र करतात. हे चवीला चांगलं लागतं. पण जर कांदा वेगळा खात असाल तर त्यासोबत दही खाणं योग्य नाही. दोन्ही विरूद्ध आहार आहे. यामुळे तुम्हाला एलर्जी, खाज, एग्जिमा, सोरोसिस होऊ शकतो.