Foods Bad For Liver: लिव्हर जेव्हा खराब होऊ लागतं तेव्हा शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करू लागतात. तेच आजकाल जास्तीत जास्त लोकांना लिव्हरसंबंधी समस्या होऊ लागतात. अशात जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर तुमचं लिव्हर खराबही होऊ शकतं. तेच आजकाल जास्तीत जास्त लोक बाहेरचं खातात, पण अनेकांना हे माहीत नाही की, हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अनेकांना हेच वाटतं की, दारू पिऊनच लिव्हर खराब होतं. पण असं नाहीये. चला जाणून घेऊन लिव्हर खराब होण्याची इतर कारणे...
मैदा - मैद्यापासून तयार पदार्थ खाणं नेहमीच टाळलं पाहिजे. याचं कारण यात मिनरल्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स कमी असतात. ज्यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळेच तुम्ही पास्ता, पिझ्झा आणि ब्रेड सारख्या गोष्टींचं सेवन करणं टाळलं पाहिजे. हे पदार्थ नियमित खात असाल तर लिव्हर डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे आजपासूनच मैद्यापासून तयार पदार्थ खाणं बंद करा.
साखर - लठ्ठपणा वाढवण्यासोबतच साखरेमुळे लिव्हर खराब होण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे तुम्हाला लिव्हरसंबंधी काहीही समस्या जाणवत असेल तर डाएटमधून साखर लगेच दूर करा. कारण साखरेमुळे किंवा सारखेच्या पदार्थांमुळे लिव्हर डॅमेज होऊ शकतं.
फास्ट फूड - फास्ट फूड पचवणं फार अवघड असतं. त्यामुळे बर्गर, फ्रेंच फ्राइज, नूडल्स सारखे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. कारण यांच्या सेवनाने लिव्हरला नुकसान पोहोचू शकतं.
सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स - तुम्हाला सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असेल तर लगेच बंद करा. कारण यांच्या सेवनाने लिव्हर डॅमेज होऊ शकतं आणि अनेक शारीरिक समस्याही होऊ शकतात. कारण या ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. हेच कारण आहे की, यांच्या सेवनाने लठ्ठपणा आणि शरीरात फॅट वाढण्याचा धोका असतो.
मिठाचं जास्त सेवन - मिठाचं जास्त सेवन केल्यानेही लिव्हरचं नुकसान होतं. जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्याने शरीरात वॉटर रिटेंशन होऊ शकतं. जे शरीरासाठी चांगलं नाही. पॅकेज्ड फूड जसे की, खारे बिस्कीट, चिप्स, स्नॅक्स इत्यादी खाणं टाळलं पाहिजे. यात सॅच्युरेटेड फॅट आणि सोडिअम जास्त प्रमाणात असतं. याने फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणाची समस्या वाढते.
मद्यसेवन - लिव्हर खराब होण्यापासून वाचवायचं असेल तर मद्यसेवन टाळलं पाहिजे. कारण दारूमुळे लिव्हर डॅमेज होतं. इतकंच नाही तर जास्त दारू प्याल तर लिव्हरवर सूजही येते. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दारू बंद करा.