मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. बऱ्याचदा खाण्यासाठी मुळ्याच्या कंदाचा वापर करण्यात येतो तर मुळ्याची पाने टाकून देण्यात येतात. परंतु असे करणे चुकीचे आहे. मुळ्याच्या पानांचा खाण्यामध्ये समावेश करणे अत्यंत उपयुक्त ठरते. मुळ्याचा समावेश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. मुळ्यात प्रथिनं, करबोदकं, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. मुळ्याचा उपयोग कोशिंबीर, भाजी, पराठे, रायता आणि लोणचे करण्यासाठी केला जातो. जाणून घेऊयात मुळ्याचे शरिराला उपयुक्त असे फायदे...
- रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.
- सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय म्हणून मुळ्याचा वापर होतो. मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
- मुळ्याच्या ताज्या पानांच्या रसाचा उपयोग मुतखड्यावरही परिणामकारक ठरतो.
- मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांच्या रसात अधिक गुणधर्म असतात. ही पाने पचण्यास हलकी असतात. परंतु पाने उष्ण असतात, त्यामुळे बऱ्याचदा पित्त वाढण्याची शक्यता असते. म्हणून मुळ्याच्या पानांची भाजी खाणे फायदेशीर ठरते.
- किडनीच्या विविध विकारांवरही मुळा खाणे हे औषधी ठरते.
- मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते याचे सेवन केल्याने भूक भागवण्यासही मदत होते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
- कावीळीवरही मुळा खाणे फायदेशीर ठरते. कावीळ झाली असल्यास अनोशापोटी मुळा खाल्यास कावीळ पूर्णत: बरी होते.
- तापावरही मुळ्याची भाजी अत्यंत गुणकारक ठरते. मुळ्यामध्ये ज्वरनाशक गुणधर्म असतात.
- मुळ्याचा आहारात समावेश केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत होते.
- डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा खाणे उपयुक्त आहे.
- मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो.
- त्वचेसाठीही मुळा आरोग्यवर्धक ठरतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिस्न दूर होऊल त्वचा उजळण्यास मदत होते.
- मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते.